Fertilizer Shortage Agrowon
ॲग्रो विशेष

Fertilizer Shortage : केळी पट्ट्यात खत तुटवड्याची तक्रार कायम

Fertilizer Linking : युरिया, १०.२६.२६ ची अडचण कमी आहे. परंतु खरीप हंगाम सुरू होत असून, या हंगामात युरिया, १०.२६.२६ व डीएपी या खतांचा तुटवडा, समस्या दूर करण्याचे आव्हान कृषी विभागासमोर आहे.

Team Agrowon

Jalgaon News : विविध खत कंपन्या लिंकिंग करून खतांचा पुरवठा करीत असल्याची ओरड खत वितरक, विक्रेत्यांत कायम आहे. यातच डीएपीचा पुरवठा कंपन्यांकडून रखडत सुरू आहे. युरिया, १०.२६.२६ ची अडचण कमी आहे. परंतु खरीप हंगाम सुरू होत असून, या हंगामात युरिया, १०.२६.२६ व डीएपी या खतांचा तुटवडा, समस्या दूर करण्याचे आव्हान कृषी विभागासमोर आहे.

मध्यंतरी जिल्ह्यातील खत विक्रेत्यांनी लिंकिंगशिवाय खते न देणाऱ्या खत पुरवठादार, कंपन्यांविरोधात नाराजी व्यक्त करून संबंधितांवर कारवाई केली जावी, तंबी दिली जावी, अशी मागणी केली होती. कंपन्याच लिंकिंग करतात, यामुळे ही खते विक्रेत्यांना महाग पडतात. कंपन्यांनी लिंकिंग केलेल्या खतांत मोठी गुंतवणूक करावी लागते.

लिंकिंगवर विविध अन्नघटक, अन्नद्रव्ये कंपन्या देतात. यात काही कंपन्यांची लिंकिंग केलेली खते दुय्यम दर्जाची असल्याचाही आरोप केला जातो. अशातच खानदेशात डीएपीचा पुरवठा रब्बीत कमी होता. त्याचा साठा पुरेसा दिसत होता. पण काही वितरकांकडून कृत्रिम टंचाईदेखील तयार केली जात होती. सध्या खतपुरवठा खरिपासंबंधी सुरू आहे. यात डीएपीचा पुरवठा कमीच आहे.

युरिया, १०.२६.२६ पुरेसे आहे. परंतु पाऊस सुरू होताच युरिया, १०.२६.२६ ची मोठी खरेदी काही शेतकरी करतील. यामुळेही टंचाई किंवा कृत्रिम टंचाईची समस्या तयार होईल, अशी स्थिती आहे. यात डीएपीची समस्या अद्याप कायम आहे. डीएपी खत पुरेसे आहे, असे कृषी विभाग म्हणतो. प्रत्येक वितरक, विक्रेत्यांकडील खतसाठा अॅपमध्ये किंवा कृषी यंत्रणांनी विकसित केलेल्या व्यवस्थेत ऑनलाइन शेतकरी लागलीच पाहू शकतो.

जे वितरक, खत विक्रेते डीएपी व अन्य खते आपल्याकडे असूनही देणार नाहीत, त्यांची माहिती, लेखी तक्रार कृषी विभागाला द्यावी, असे जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने म्हटले आहे. जळगाव जिल्ह्यात राज्यात सर्वाधिक खतवापर आहे.

केळी पट्ट्यात बारमाही खतांची मागणी आहे. यामुळे खतांबाबत किंवा खततुटवड्याची तक्रार कायम आहे. जळगाव जिल्ह्यात सुमारे सव्वातीन लाख टन खतांचा पुरवठा खरिपात होईल. यात युरिया, पोटॅश व सिंगल सुपर फॉस्फेटचा पुरवठा संयुक्त खतांच्या तुलनेत अधिक राहील. युरियाचा सुमारे ७८ हजार टन पुरवठा एकूण हंगामात होईल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disability Certificate Verification: दिव्यांग प्रमाणपत्राची टक्केवारी चाळीस टक्क्यांपेक्षा पेक्षा कमी

Summer Irrigation: उन्हाळी सिंचनातून हजारो हेक्टरला दिलासा

MLA Sanjay Puram: धान खरेदीचे उद्दिष्ट वाढविण्याची मागणी

Radhakrishna Vikhe Patil: नांदूर मध्यमेश्वरला शेती नापीक होण्याच्या प्रश्नावर करणार उपाय

Minor Irrigation Tax: पाटबंधारे विभागाने तातडीने ‘मायनर कर’ वसुली थांबवावी

SCROLL FOR NEXT