DAP Shortage Agrowon
ॲग्रो विशेष

Fertilizer Shortage : डीएपी खताची टंचाई

DAP Fertilizer Demand : कृषी विभागाकडून खरीप हंगामासाठी ३६ हजार २०० टन डीएपी खताच्या साठ्याची मागणी नोंदविण्यात आली आहे.

Team Agrowon

Amaravati News : पेरण्यांच्या कालावधीत शेतकऱ्यांकडून मागणी असलेल्या डीएपी खतांचा बाजारात चांगलाच तुटवडा निर्माण झाला आहे. युरिया मुबलक प्रमाणात उपलब्ध असला तरी डीएपीसाठी शेतकऱ्यांची खुल्या बाजारात चांगलीच शोधाशोध सुरू आहे. परिणामी १३५० रुपयांची ५० किलोची बॅग दामदुप्पट भावात खरेदी करण्याची वेळ आली आहे.

यंदाच्या खरीप हंगामात अमरावती जिल्ह्यासाठी युरियाचा ३५ हजार ४०५ टन व डीएपीचा २१ हजार २४४ टन साठा मंजूर करण्यात आला आहे. कृषी विभागाकडून खरीप हंगामासाठी ३६ हजार २०० टन डीएपी खताच्या साठ्याची मागणी नोंदविण्यात आली आहे. ५ हजार ८४८ टन साठा १ ते १७ जून या कालावधीत उपलब्ध झाला.

गत रब्बी हंगामातील ३५१६ टन साठा शिल्लक होता. एकूण ५ हजार ८४८ टन साठा उपलब्ध झाला आहे. शेतकऱ्यांनी आतापर्यंत ४ हजार ३६२ टन साठा खरेदी केला आहे. खरीप २०२४ मध्ये १५ हजार ९३० टन खत वापरण्यात आले आहे.

१५ हजार ३९६ टन खत अजूनही उपलब्ध झालेले नाही. डीएपीचा पुरवठा टप्प्याटप्प्याने करण्यात येतो, असे कृषी विभागाकडून सांगण्यात आले. दरम्यान, बाजारात शेतकऱ्यांना डीएपी खत मिळत नसल्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. १३५० रुपयांना ५० किलोची एक बॅग असून त्यासाठी शोधाशोध सुरू झाली आहे.

नॅनो डीएपी वापरण्याचा सल्ला

शेतकऱ्यांनी नॅनो डीएपी वापरण्याचा सल्ला कृषी विभागासह कृषी निविष्ठा विक्रेत्यांनी दिला आहे. नॅनो डीएपी प्रभावी असून त्याची मात्राही कमी प्रमाणात लागत असल्याने खर्च कमी येणार आहे. अर्धा लिटर नॅनो डीएपीसाठी ६०० रुपये मोजावे लागत असून एक एकरसाठी ते पुरेसे असल्याचे सांगण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Accident Scheme: तीस दिवसांच्या अटीऐवजी १२० दिवसांच्या मुदतीचा प्रस्ताव

Godavari Flood Management : गोदावरी पूरप्रश्नी कायमस्वरूपी उपाययोजनांवर भर

Green Monsoon Drive : ‘ग्रीन मॉन्सून’ अंतर्गत दऱ्याई माता परिसरात ५ हजार देशी वृक्षांचे रोपण

Jalyukt Shivar Abhiyan: जलयुक्त शिवार योजनेची ६२२ कामे अंतिम टप्प्यात

District Central Bank : जिल्हा मध्यवर्ती बॅंकेने दिली ४५८१ सभासदांची यादी

SCROLL FOR NEXT