Kolhapur Rain agrowon
ॲग्रो विशेष

Kolhapur Rain : वादळी वाऱ्याने कोल्हापुरातील कोट्यवधींचे नुकसान, चंदगड, शाहुवाडी तालुक्यांना मोठा फटका

Kolhapur Rain Damage : कोल्हापूर जिल्ह्यात आतापर्यंत एक कोटी पाच लाख ४७ हजार रुपयांहून अधिक रुपयांचे नुकसान झाले आहे.

sandeep Shirguppe

Crop Damage Kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यात मागच्या काही दिवसात झालेल्या वळवाच्या पावसाने जोरदार झोडपून काढलं. दरम्यान वादळी वारा, गारांचा पाऊस आणि झालेल्या मुसळधार वळीव पावसाने जिल्ह्यातील शेती पीक, खासगी आणि सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एक कोटी पाच लाख ४७ हजार रुपयांहून अधिक रुपयांचे नुकसान झाले आहे. चंदगड तालुक्यात सर्वाधिक ५७ लाख ८९ हजार ५०० रुपयांचे नुकसान झाले आहे.

राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत जिल्ह्याला कमी फटका बसला आहे. तरीही, गेल्या आठवडा - दोन आठवड्यांत झालेल्या वळीव पावसात अनेक ठिकाणी घरांच्या छतावरील पत्रे उडाले, भिंतींची पडझड, शाळांचे, स्मशानशेडचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे. पावसासह जोरदार येणाऱ्या वाऱ्याचा फटका या सर्वच मालमत्तांना बसत असल्याचे चित्र आहे. यावर्षी वाऱ्याची तीव्रता सर्वाधिक दिसून येत आहे.

वळीव पावसामुळे लोकांना दिलासा मिळत असला तरीही वादळामुळे होणारे नुकसान मात्र दु:ख देत असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. दरम्यान, जिल्ह्यात वळीव पावसामुळे होणाऱ्या नुकसानीची दररोज माहिती घेतली जात आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापनासह इतर सर्व शासकीय कार्यालयांकडून पावसाची माहिती संकलित केली जात आहे.

जिल्ह्यात सोमवारीही वाऱ्याचा वेग धडकी भरवणारा होता. यामध्ये खूप मोठे नुकसान झाले आहे. याची माहिती घेतली जात आहे. आतापर्यंत सर्वाधिक नुकसान हे चंदगड तालुक्यात झाले आहे. त्यानंतर शाहूवाडी तालुक्याचा क्रमांक लागतो. या दोन्ही तालुक्यांत पावसापेक्षा जोरदार वाऱ्याचा फटका बसला आहे.

विजा चमकताना घराबाहेर पडू नका

‘जिल्ह्यात सोसाट्याचा वारा आणि जोरदार पाऊस होत आहे. तसेच, विजाही चमकत आहेत. त्यामुळे विजा चमकत असताना लोकांनी घराबाहेर पडू नये’, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ यांनी केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

New Gram Panchayat Schemes: ग्रामपंचायतींसाठी पाच नव्या योजनांना मंजुरी

Cibil Score Issue: कर्जमुक्ती योजनेमुळे सिबिल स्कोअरवर परिणाम : तुपकर

Farmer Protest Warning: ‘डीबीटी’साठी शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

Mechanical Paddy Transplanting: चिखलगावात यांत्रिक पद्धतीने भात लागवड

Onion Tomato Report: कांदा, टोमॅटोचा अहवाल १५ ऑगस्टपर्यंत सादर करा: पाशा पटेल समितीला निर्देश

SCROLL FOR NEXT