Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage In Parbhani : पूर्णा तालुक्यात पाच हजार ४१५ हेक्टरवर नुकसान

परभणी जिल्ह्यात १ एप्रिल ते २९ एप्रिल या कालावधीत झालेला वादळी पाऊस, गारपिटीमुळे सेलू, पूर्णा, गंगाखेड या ३ तालुक्यांतील ५ हजार ५६६ हेक्टरवर पिकांना फटका बसला आहे.

Team Agrowon

Parbhani News : परभणी जिल्ह्यात १ एप्रिल ते २९ एप्रिल या कालावधीत झालेला वादळी पाऊस, गारपिटीमुळे सेलू, पूर्णा, गंगाखेड या ३ तालुक्यांतील ५ हजार ५६६ हेक्टरवर पिकांना फटका बसला आहे.

त्यात एकट्या पूर्णा तालुक्यातील १३ गावांतील ६ हजार ६५३ शेतकऱ्यांच्या ५ हजार ४१५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे, अशी माहिती महसूल विभागाच्या सूत्रांनी दिली.

तीन तालुक्यांत एकूण सहा हजार ८३४ शेतकऱ्यांच्या जिरायती, बागायती, फळपिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तसेच वीज कोसळून ३ व्यक्तींचा मृत्यू झाला. ५७ जनावरे दगावली.

एप्रिलमधील वादळी पावसाचा फटका जिल्ह्यातील ३८ गावांतील शेतकरी तसेच पशुपालकांना बसला आहे. पूर्णा तालुक्यातील १३ गावांतील ६ हजार ६५३ शेतकऱ्यांच्या ५ हजार ४१५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले.

त्यात बागायती पिकांचे क्षेत्र ५ हजार २९० हेक्टर, फळपिकांचे क्षेत्र १२५ हेक्टर आहे. सेलू तालुक्यातील ६ गावांतील १८० शेतकऱ्यांचे १५० हेक्टर क्षेत्र बाधित आहे.

त्यात जिरायती पिकांचे क्षेत्र ३७ हेक्टर, बागायती क्षेत्र ८१ हेक्टर, फळपिकांचे क्षेत्र ३२ हेक्टर आहे. गंगाखेड तालुक्यातील १ हेक्टर क्षेत्र बाधित आहे.

वीज पडून मानवत, पूर्णा, जिंतूर तालुक्यात प्रत्येकी एक अशा एकूण ३ व्यक्तींचा मृत्यू झाला. तर परभणी तालुक्यात २, सेलू तालुक्यात १, जिंतूर तालुक्यात ४०, मानवत तालुक्यात २ अशी एकूण ४५ जनावरे दगावली आहेत.

ओढकाम करणारी ८ जनावरे दगावली. त्यात परभणी, जिंतूर, पाथरी तालुक्यांतील प्रत्येकी १, सेलू तालुक्यातील ३ आणि गंगाखेड तालुक्यातील २ जनावरांचा समावेश आहे. परभणी तालुक्यातील १, मानवत तालुक्यातील २, सोनपेठ तालुक्यांतील ३ असे मिळून एकूण ७ घरांची अंशतः पडझड झाली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disability Certificate Verification: दिव्यांग प्रमाणपत्राची टक्केवारी चाळीस टक्क्यांपेक्षा पेक्षा कमी

Summer Irrigation: उन्हाळी सिंचनातून हजारो हेक्टरला दिलासा

MLA Sanjay Puram: धान खरेदीचे उद्दिष्ट वाढविण्याची मागणी

Radhakrishna Vikhe Patil: नांदूर मध्यमेश्वरला शेती नापीक होण्याच्या प्रश्नावर करणार उपाय

Minor Irrigation Tax: पाटबंधारे विभागाने तातडीने ‘मायनर कर’ वसुली थांबवावी

SCROLL FOR NEXT