Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage : सोलापूर जिल्ह्यात अडीच हजार हेक्टरवर नुकसान

Crop Damage Survey : सोलापूर जिल्ह्यात गेल्या आठवड्यात अवकाळी पावसामुळे शेतीपिकांना मोठा फटका बसला. प्राथमिक माहितीनुसार, २५५२ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.

Team Agrowon

Solapur News : सोलापूर जिल्ह्यात गेल्या आठवड्यात अवकाळी पावसामुळे शेतीपिकांना मोठा फटका बसला. प्राथमिक माहितीनुसार, २५५२ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. त्याशिवाय सुमारे दोन व्यक्तींसह ७२ जनावरांचा मृत्यूही यात झाला आहे. पंचनाम्याचे आदेश दिले आहेत. तसेच नुकसानीचा अहवाल तयार करण्याचे काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार या स्वतः या कामाचा आढावा घेत आहेत. एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे (Unseasonal Rain) दोन व्यक्तींचा मृत्यू झाला. शासनाने नैसर्गिक आपत्तीच्या काळात निधी वितरित करण्यासंदर्भातील आदेश दिले आहेत. त्यामुळे अवकाळी पावसात मृत व्यक्ती व जनावरांसाठी नुकसान भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पण शेतीच्या नुकसानीचे पंचनामे अजून पूर्ण झालेले नाहीत.

कृषी विभागाकडील प्राथमिक अंदाजानुसार, जिल्ह्यातील अडीच हजार हेक्टरवरील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यात केळी, आंबे, द्राक्ष अशा पिकांचा समावेश आहे. दरम्यान, पंचनामे वेळेत पूर्ण करून तातडीने अहवाल देण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधितांना दिले आहेत. पंचनामे पूर्ण झाल्यावर नेमके किती नुकसान झाले आहे, त्याचा अहवाल शासनाला सादर केला जाईल.

नुकसानीचा आढावा घेत आहोत, पण शासनाकडून कधीपर्यंत भरपाई मिळेल, हे स्पष्टपणे आताच कोणीही सांगू शकत नाही. तोपर्यंत, मृत जनावरांच्या नुकसानीपोटी भरपाई तातडीने वितरित केली जात आहे.
मनीषा कुंभार, निवासी उपजिल्हाधिकारी, सोलापूर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Delimitation Bill: मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला पाठिंबा देणार का? सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या

Farm Drainage Equipment: काळ्या, चिकणमातीयुक्त जमिनी सुधारासाठी मोलनांगर

Watershed Management: नाला अन् जलवाहिनी उपचार पद्धती

Green Biorefinery Technology: शेतावरील ग्रीन बायोरिफायनरी

Crop Compensation: ‘शेतकऱ्यांना प्रलंबित भरपाई द्या’

SCROLL FOR NEXT