Watermelon Crop Damage  Agrowon
ॲग्रो विशेष

Watermelon Crop Damage : पातुर्ड्यात सात एकरातील खरबूज पिकाचे नुकसान

शेतकरी वासुदेव कुरवाडे, महादेव कुरवाडे, गोकुळा किसन कुरवाडे यांची वानखेड भाग दोन व पातुर्डा खुर्द शिवारात शेती आहे.

Team Agrowon

Sangrampur News : तालुक्यातील पातुर्डा खुर्द व वानखेड भाग दोन शिवारात गेल्या काळात झालेल्या गारपिटीमुळे (Hailstorm) सात एकरांतील खरबूज पिकाचे (Kalingad Damage) संपूर्ण नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांनी नुकसानीपोटी मदतीची मागणी केली आहे.

तालुक्यातील नेकनामपूर येथील शेतकरी वासुदेव कुरवाडे, महादेव कुरवाडे, गोकुळा किसन कुरवाडे यांची वानखेड भाग दोन व पातुर्डा खुर्द शिवारात शेती आहे. दरवर्षी ते खरबूजाची शेती करीत असतात. तीनही शेतकऱ्यांची सात एकरात यंदा खरबुजाची लागवड केली होती.

बी, खत, मल्चिंगवर ७० ते ८० हजार रुपये एकरी खर्च केला. दरवर्षी २ लाखांपर्यंत उत्पन्न मिळते. मात्र, काही दिवसांपूर्वी झालेल्या वादळी वारा व गारपिटीमुळे सर्व सात एकरातील खरबूज पिकाचे नुकसान झाले. यामुळे मोठा आर्थिक फटका बसला आहे.

अद्याप कोणताही अधिकारी नुकसानीची पाहणी करण्यासाठी आला नाही. शेतकरी वासुदेव कुरवाडे यांची पातुर्डा खुर्दमध्ये तीन एकर, महादेव कुरवाडे यांनी वानखेड भाग दोनमध्ये दोन एकर, गोकुळा कुरवाडे यांनी वानखेड भाग दोनमध्ये दोन एकर खरबूज लागवड केली होती.

शेतातील खरबूज पिकाची पाहणी करून पंचनामा करून मदत मिळवून द्यावी, अशी मागणी उपसरपंच नीलेश चांडक यांनी केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Interview with Dada Lad: दादा लाड तंत्रज्ञानाचा देशभर प्रसार व्हावा

Papaya Mealybug Infestation: पपईवरील पिठ्या ढेकणाची वाढती समस्या

Ai in Rural Development: कृत्रिम बुद्धिमत्ता अन् ग्रामीण भारत

FPC Success Story: महिला शेतकरी कंपनीची भरारी !

Soybean Processing Success: सोयाबीन प्रक्रियेतून महिला गटाची प्रगती

SCROLL FOR NEXT