Heavy Rainfall Agrowon
ॲग्रो विशेष

Heavy Rainfall : सांगली जिल्ह्यात १५ मंडलांत अतिवृष्टीने नुकसान

Unseasonal Rainfall : जिल्ह्यातील सहा तालुक्यांतील पंधरा मंडल क्षेत्रांमध्ये गुरुवारी (ता.९) अतिवृष्टीची नोंद झाली आहे. तेथे ६५ मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला आहे.

Team Agrowon

ॲग्रोवन वृत्तसेवा
Sangali News
: सांगली : जिल्ह्यातील सहा तालुक्यांतील पंधरा मंडल क्षेत्रांमध्ये गुरुवारी (ता.९) अतिवृष्टीची नोंद झाली आहे. तेथे ६५ मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. या ठिकाणी महसूल, जिल्हा परिषद आणि कृषी विभागामार्फत पंचनामे सुरू करण्याचे आदेश देण्यात आलेत, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिली.

मिरज तालुक्यात सांगली, कवलापूर, बेळंकी, भोसे, कवठेपिरान, कुपवाड, जत तालुक्यात डफळापूर, खानापूर तालुक्यात भाळवणी, तसेच वाळवा, कवठेमहांकाळ तालुक्यात कवठेमहांकाळसह ढालगाव, देशिंग, हिंगणगाव, कडेगाव तालुक्यात वांगी, चिंचणी या मंडलांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे. या पावसाने पिकांचे, घराचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. त्याबाबत तातडीने जागेवर जाऊन पंचनामा करावा, असे आदेश देण्यात आले आहेत. त्यात विशेषतः द्राक्ष पिकांचे नुकसान झाले आहे.

गुरुवारी (ता. ९) जिल्ह्याला पावसाने जोरदार झोडपले. प्रचंड पाऊस झाला. एका दिवसांत सगळीकडे पाणी पाणी झाले. हा पाऊस रब्बी पिकांना तारक असला तरी अतिवृष्टीने अनेक ठिकाणी बागायती पिकांसह रब्बीचे नुकसान झाले आहे. त्याचा आता पंचनामा होईल.

इथे झाली अतिवृष्टी
मंडलनिहाय (मिलिमीटर)

सांगली - १००, कवलापूर - ७५, बेळंकी - ६८,
भोसे - ७२, कवठेपिरान - ६५, कुपवाड- ७५, डफळापूर - ७४, भाळवणी - ८९, वाळवा -६६, कवठेमहांकाळ - ७४, ढालगाव १०१, देशिंग १४३, हिंगणगाव - ७४, वांगी - ७५, चिंचणी - ७३

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Harbhara Tur Kharedi: हरभरा-तूर खरेदीला मुदतवाढ; मेअखेरपर्यंत दिलासा

Jintur Water Shortage: जिंतूर तालुक्यातील ३ गावांना ५ टँकरद्वारे पाणीपुरवठा

Yeola Acid Attack Case: ‘पोलिस मित्र’च निघाला शेतकऱ्यावरील अ‍ॅसिड हल्ल्याचा सूत्रधार

Parbhani Crop Insurance: परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण विमा परतावा द्या: कृषिमंत्री भरणे

Sustainable Farming: शेतकऱ्यांनी शाश्वत शेती पद्धतींचा अवलंब करावा

SCROLL FOR NEXT