Dhom Canal Burst Agrowon
ॲग्रो विशेष

Dhom Canal Burst : धोमच्या डाव्या कालव्याला भगदाड पडल्याने नुकसान

Dhom Dam Irrigation : आधीच दुष्काळ जिल्ह्यात आहे. पाऊस कमी झाल्याने खटाव- माणसह जिल्ह्यातील जनता पाणी पाणी करू लागली आहे.

Team Agrowon

Satara News : पांडे (ता.वाई) येथे धोम धरणाचा डावा कालवा शुक्रवारी (ता.१५) मध्यरात्री तीन वाजण्याच्या सुमारास पडल्याने मोठ्या प्रमाणावर पाणी ओझर्डे गावच्या चंद्रभागा ओढ्यात शिरले. ओढ्याला पुराचे स्वरूप आले असून यामध्ये झोपेत असलेल्या ऊस मजुरांचा संसार वाहून गेला आहे.

दोन बैलांची शोध मोहीम सुरू असून १२ बैल वाचवण्यात यश आले आहे. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी वाईचे प्रांताधिकारी राजेंद्रकुमार जाधव, भुईंज पोलिस ठाण्याचे एपीआय रमेश गर्जे हे पहाटे चार वाजता पोहचले. ऊसतोड मजुरांना मदत प्रशासनाकडून सुरू होती. त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.

आधीच दुष्काळ जिल्ह्यात आहे. पाऊस कमी झाल्याने खटाव- माणसह जिल्ह्यातील जनता पाणी पाणी करू लागली आहे. दुष्काळी भागातील जनतेची तहान भागवण्यासाठी वाई तालुक्यातील धोम धरणातून कालव्याद्वारे पाणी सोडले गेले आहे.

त्याच कालव्याला पांडे गावच्या हद्दीत मध्यरात्री तीन वाजता भगदाड पडले. पाण्याचा प्रवाह एवढा मोठा होता की कालव्यातील पाणी शेतातून थेट चंद्रभागा ओढ्याच्या पात्रात घुसले. शेतीचे नुकसान करत हे पाणी ओढ्यात घुसले. दिवसभर ऊस तोड करून झोपलेल्या ऊसतोड मुजरांच्या दीडशे झोपडीत पाणी शिरले.

त्यांचे संसारोपयोगी साहित्य वाहून गेले. १२ बैल वाचविण्यात यश आले. दोन बैल बेपत्ता झाले असून त्यांची शोध मोहीम सुरू होती. या घटनेची माहिती मिळताच वाईचे प्रांत राजेंद्रकुमार जाधव, भुईंज पोलिस ठाण्याचे एपीआय रमेश गर्जे हे पहाटे चार वाजता घटनास्थळी पोहोचले. प्रशासनाने ऊस तोड मजुरांना सुरक्षित स्थळी हलवले असून कोणतीही जीवितहानी झाली नाही.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bajara Farming: बाजरीची पेरणी आणि खत व्यवस्थापन; चांगल्या उत्पादनासाठी महत्त्वाच्या गोष्टी

RBI MPC Meeting 2026: कर्जाचा हप्ता वाढणार नाही, पण कमी पावसामुळे महागाई वाढणार- आरबीआय गर्व्हनर

Modern Sowing Machines: पेरणीकरिता आधुनिक यंत्रांचा वापर

Crop Impact Management: विदर्भातील पर्जन्यमान अन् पिकांवरील परिणाम

Kharif Crop Planning: खरिपाच्या पूर्वतयारीसाठी हे मुद्दे नका विसरू

SCROLL FOR NEXT