Milk Farmer Agrowon
ॲग्रो विशेष

Milk Rate : कुठे रस्त्यावर दूध ओतून, कुठे शासन आदेशाची होळी, तर कुठे दुग्धाभिषेक', सरकारविरोधात शेतकरी आक्रमक

Milk Procurement Rate : दूध दरवाढीच्या मागणीसाठी आज राज्यभरात दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्यावतीने आंदोलन करण्यात आले.

Swapnil Shinde

Dairy Farmer Protest : दूध दर वाढीच्या मागणीसाठी संपूर्ण राज्यभरात दूध उत्पादक संघर्ष समिती आक्रमक झाली आहे. कुठे रस्त्यावर दूध ओतून, कुठे सरकारचा निषेध करून तर कुठे शासन आदेशाची होळी करून आंदोलन करण्यात आले. त्यामुळे एकूणच राज्यभरात दूध दर वाढीच्या आंदोलनाची तीव्रता पाहायला मिळत असून सरकारने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी आंदोलकांकडून केली जात आहे.

चार महिन्यापूर्वी दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दूध संघ आणि उत्पादक शेतकऱ्यांची बैठक बोलावली. या बैठकीमध्ये शासनाने ३४ रुपये दर देण्याचा आदेश काढला होता. मात्र, राज्यभरातील दूध संघांकडून सुमारे २७ रुपये प्रति लिटर प्रमाणे खरेदी करीत आहे. याप्रश्नावर किसान सभा आणि रयत क्रांती संघटनेच्यावतीने आक्रमक भूमिका घेण्यात आली.

त्यानंतर दुग्धविकास मंत्र्यानी दूध संघ व शेतकरी प्रतिनिधींची दुध दराबाबत बोलावलेली बैठक निष्फळ ठरली. सरकारने जाहीर केल्याप्रमाणे ३४ रुपये दर देण्यास दूध संघांनी नकार दिला आहे. त्याच्या निषेधार्थ दूध उत्पादक संघर्ष समितीच्यावतीने आज दि. २४ पासून राज्यभरात दूध संकलन केंद्रांवर शासन आदेशाची होळी करण्यास सुरुवात झाली आहे.

किसान सभेचे नेते अजित नवले यांच्या नेतृत्वाखाली नाशिक जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील आंबडमध्ये दूध ओतून आंदोलन करण्यात आले. यावेळी सरकारच्या धोरणाचा निषेध करण्यात आला. तर माजी आमदार सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली रयत क्रांती संघटनेच्यावतीने रेठरेधरण ता. वाळवा जि. सांगली येथे शासनाच्या आदेशाची होळी करण्यात आली. त्याचबरोबर रयत क्रांती संघटनेचे कार्याध्यक्ष दीपक भोसले यांच्या नेतृत्वाखाली मुंढेवाडी, ता. पंढरपूर, जि. सोलापूर येथे रस्त्यावर दूध ओतून आंदोलन केले. रयत क्रांती संघटना युवा जिल्हाध्यक्ष प्रकाश साबळे यांच्या नेतृत्वाखाली शिवथर, ता. येथे शेतकऱ्यांनी शासनाच्या निषेधार्थ घोषणाबाजी करण्यात आली. इंदापूर, जि. पुणे येथील शिवधर्म फाउंडेशन यांच्या वतीने निरा नरसिंहपुरमधील लक्ष्मी नरसिंहाला दुग्धाभिषेक घालण्यात आला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

New Gram Panchayat Schemes: ग्रामपंचायतींसाठी पाच नव्या योजनांना मंजुरी

Cibil Score Issue: कर्जमुक्ती योजनेमुळे सिबिल स्कोअरवर परिणाम : तुपकर

Farmer Protest Warning: ‘डीबीटी’साठी शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

Mechanical Paddy Transplanting: चिखलगावात यांत्रिक पद्धतीने भात लागवड

Onion Tomato Report: कांदा, टोमॅटोचा अहवाल १५ ऑगस्टपर्यंत सादर करा: पाशा पटेल समितीला निर्देश

SCROLL FOR NEXT