Red Banana  Agrowon
ॲग्रो विशेष

Red Banana Farming : डहाणूच्या मातीत उगवली लाल केळी

Banana Production : सध्या जिल्ह्यात बदलते वातावरण, अवकाळीचे संकट अशा अनेक कारणांमुळे शेतकरी वर्ग संकटात सापडला आहे.

Team Agrowon

Palghar News : डहाणू तालुक्यातील नरपड येथील तरुण युवा शेतकरी प्रतीक पाटील यांनी आपल्या फळबागेमध्ये पारंपरिक पिवळ्या रंगाच्या केळीसोबतच जांभळ्या-लाल सालीच्या केळीची लागवड केली आहे. केळीचे लोंगर चांगल्या स्थितीत असून अशा नावीन्यपूर्ण प्रयोगाचे आकर्षण वाढत आहे.

सध्या जिल्ह्यात बदलते वातावरण, अवकाळीचे संकट अशा अनेक कारणांमुळे शेतकरी वर्ग संकटात सापडला आहे. जिल्ह्याच्या समुद्रकिनारी भागात आंबा, चिकूच्या बागा विस्तारल्या आहेत, तर काही भागांत केळी, जाम, लीची, नारळ अशा फळबागांचे क्षेत्रही विस्तृत प्रमाणात आहे.

मागील पंधरा वर्षांत जिल्ह्यातील हजारो विद्यार्थी कृषी तंत्र विद्यालय, आसनगाव येथून कृषी तंत्र पदविका अभ्यासक्रम पूर्ण करून आपल्या शेतीत शाश्वत उत्पादन देणाऱ्या दुर्मिळ पिकांची लागवड करून शेतीमध्ये यशस्वी झाले आहेत. असाच यशस्वी प्रयोग डहाणू तालुक्यातील नरपड येथील तरुण युवा शेतकरी प्रतीक पाटील यांनी केला आहे. त्यांनी जांभळ्या-लाल सालीच्या केळीची लागवड केली आहे.

खास वैशिष्ट्य

लाल केळी लालसर किंवा जांभळ्या रंगाच्या सालीची असते, जी साधारण केळीपेक्षा वेगळी दिसते. पारंपरिक पद्धतीने लागवड केलेल्या केळी या सुरुवातीच्या अवस्थेत असताना रंग हिरवा असतो. पिकल्यानंतर त्याचे रूपांतर पिवळ्या रंगात होते. नवीन जातीच्या केळीचा रंग केळी कच्ची असताना जांभळा असतो आणि पिकल्यानंतर ती लाल होतात, हे खास वैशिष्ट्य आहे.

पारंपरिक शेती पद्धतीत अपेक्षित उत्पादन मिळत नाही. खते, औषधे, मजुरी यांचा खर्च वाढल्याने शेतीतून अपेक्षित उत्पादन साध्य होत नाही. पारंपरिक पिवळ्या सालीच्या केळी लागवडीबरोबरच प्रायोगिक तत्त्वावर लाल केळीची लागवड केली. जिल्ह्यातील तरुण युवा शेतकऱ्यांनी आधुनिक शेतीची तंत्रे अवगत करून दुर्मिळ आणि शाश्वत उत्पादन देणाऱ्या पिकांकडे वळावे.
- प्रतीक पाटील, युवा शेतकरी, नरपड, डहाणू

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Farmer Subcommittee: कांदा उत्पादकांच्या प्रश्नांसाठी उपसमिती; पंधरा दिवसांच अहवाल देण्याचे आदेश

Crop Damage: मे, जूनमध्ये पावसामुळे ५६ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान; कृषी विभागाची माहिती

Goras Bhandar Closure: गोरस भंडारावर कारवाई; दररोज होणाऱ्या ३ हजार ५०० लिटर दूध संकलनावर परिणाम

Offline Fertilizer Purchase: ...तोपर्यंत ऑफलाइन खत खरेदी सुरू ठेवा: शेतकरी संघटना

Banana Rate: खानदेशात केळी दर २९०० रुपयांवर

SCROLL FOR NEXT