Team Agrowon
शेतीमध्ये आता उच्चशिक्षित तरूणांचाही मोठ्या प्रमाणात सहभाग वाढताना दिसत आहे. नोकरीच्या मागे न लागता शेतीकडे एक शाश्वत व्यवसाय म्हणून तरूण बघत आहेत.
सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील वाशिंबे गावच्या अभिजित पाटील या उच्चशिक्षित तरूणाने नोकरी न करता शेती करण्याचा निर्णय घेतला.
अभिजित यांनी चार एकर क्षेत्रात लाल केळीची लागवड करून भरघोस उत्पन्न मिळवले आहे.
पुण्यात सिव्हिल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतलेल्या अभिजित गेल्या आठ वर्षांपासून शेती करत आहेत.
लाल केळीची लागवड केल्यानंतर अभिजित यांनी टप्प्याटप्प्याने माल काढला आणि पुणे, मुंबई, दिल्ली या ठिकाणच्या रिलायन्स आणि टाटा मॉलमध्ये त्याची विक्री केली.
लाल केळीला सध्या बाजारात मोठी मागणी आहे. सध्या एक किलोला ५५ ते ६० रुपयांचा दर मिळत आहे.
गेल्या काही काळात शेती क्षेत्रामध्ये अमुलाग्रबदल होत आहेत. पारंपरिक पिकांऐवजी शेतकरी नविन पिकांच्या लागवड करत आहेत.