Cyclone Agrowon
ॲग्रो विशेष

Cyclone In Sindhudurg : सिंधुदुर्गमधील आखवणे, भोम परिसराला चक्रीवादळाचा तडाखा

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आखवणे, भोम (ता. वैभववाडी) परिसराला मंगळवारी (ता. ११) सायकांळी चक्रीवादळाचा तडाखा बसला.

Team Agrowon

Sindhudutg News : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आखवणे, भोम (ता. वैभववाडी) परिसराला मंगळवारी (ता. ११) सायकांळी चक्रीवादळाचा तडाखा बसला. यामध्ये पाच घरांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. दरम्यान वीज पडल्यामुळे गवताची गंजी जळून खाक झाली.

सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. दरम्यान वैभववाडी तालुक्याच्या विविध भागांत विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. काही भागात गारांचा पाऊस झाला.

जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस सुरू आहे.

मंगळवारी सायकांळी जिल्ह्यातील आखवणे, भोम परिसराला चक्रीवादळाचा तडाखा बसला. यामध्ये आखवणेतील पाच घरांची पडझड झाली.

चक्रीवादळात आखवणेतील अंकुश नागप, तानाजी पडीलकर, राजेंद्र गुरव, मनोहर नागप, तर भोम येथील बाबाजी बांद्रे यांच्या घरांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले.

भोम गुरववाडी येथील बयाजी ढवण यांच्या गवताच्या गंजीवर वीज कोसळ्यामुळे गंजी जळून खाक झाली. तालुक्याच्या विविध भागांत विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस झाला.

वैभववाडी शहरात तासभर पाऊस सुरू होता. तर मांगवली, वेंगसर या भागात गारांचा पाऊस झाला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sustainable Wheat Farming: आपत्कालीन परिस्थितीत शाश्‍वत गहू उत्पादनाची सूत्रे

Livestock Reproductive Management: दुष्काळी परिस्थितीत गाई, म्हशींच्या प्रजननाचे नियोजन

Dairy Processing Business: संघर्षातून घेतली दुग्ध प्रक्रिया उद्योगात भरारी

Cotton Pest Management: कपाशीवरील गुलाबी बोंडअळी नियंत्रणासाठी राहा सज्ज

Gokul Dairy Politics: ‘सहकार’वरच घाला!

SCROLL FOR NEXT