Mhaisal Irrigation Scheme  Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Irrigation : रब्बीसाठी म्हैसाळचे आवर्तन सुरू

Rabi Season : यंदाच्या रब्बी हंगामात म्हैसाळ योजनेचे आवर्तन १ नोव्हेंबर ते २९ फेब्रुवारी या कालावधीसाठी सुरु केले आहे.

Team Agrowon

Sangli News : म्हैसाळ योजनेचे रब्बी आवर्तन सुरु करण्यात आले. गेल्या महिन्यात झालेल्या कालवा सल्लागारांच्या बैठकीत नियोजन केल्यानुसार आवर्तन सुरु करण्यात आल्याची माहिती पाटबंधारे विभागाने दिली असून २९ फेब्रुवारी पर्यंत रब्बीचे आवर्तन सुरु राहणार आहे. त्यामुळे सांगली जिल्ह्यासह सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

म्हैसाळ उपसा सिंचन योजनेतून १८ जुलै ते २० ऑक्टोबर या कालावधीत खरीप हंगामाचे एक आवर्तन पूर्ण झाले आहे. यंदाच्या रब्बी हंगामात म्हैसाळ योजनेचे आवर्तन १ नोव्हेंबर ते २९ फेब्रुवारी या कालावधीसाठी सुरु केले आहे. लाभ क्षेत्रातमध्ये पुच्छ भाग ते शीर्ष भाग (टेल टू हेड) धोरणाअन्वये पाणी देण्यात येणार आहे. १० डिसेंबरपर्यंत केवळ जत कालव्याच्या लाभक्षेत्राला जत, सांगोला, मंगळवेढा भागाला पाणी देण्यात येणार हे.

त्यानंतर १० डिसेंबर ते २८ फेब्रुवारीपर्यंत लाभ क्षेत्रातील विविध कालव्यांना नियोजित वेळापत्रकाप्रमाणे पाणी सोडण्यात येणार आहे.जिल्ह्यात यावर्षी मध्यम दुष्काळ जाहीर करण्यात आला. तीन मंडलांचा अपवाद वगळता संपूर्ण जिल्ह्यात यंदा टंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे.

या वर्ष वारणा धरण शंभर टक्के भरले असल्याने म्हैसाळ उपसा सिंचन योजनेतून पाणी पुरवठ्यात अडचणी येणार नाहीत. नोव्हेंबर ते मे अखेरपर्यंत सुमारे ११ टीएमसी पाणी सिंचन योजनातून पुरविले जाईल, असे प्राथमिक नियोजन करण्यात आले आहे. नोव्हेंबरच्या मध्यावर आवर्तन सुरु झाल्याने आता टोकाकडे सहज पाणी पोहोचवणे शक्य होईल असा पाटबंधारे विभागाला विश्वास आहे.

फेब्रुवारीपर्यंत रब्बीचे आवर्तन चालू राहील आणि त्यानंतर लगेच उन्हाळी आवर्तनाला सुरुवात केली जाईल. सध्या द्राक्ष हंगाम सुरु असून म्हैसाळ योजनेच्या लाभ क्षेत्रात भाजीपाला आणि उसाचे क्षेत्र देखील वाढलेले आहे. या पिकांना पाण्याकडून ताण सहन करावा लागणार नाही. १ मार्च ते ३० जून २०२४ या कालावधीत एक उन्हाळी आवर्तन देण्याचे निश्चित करण्यात आले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Indian Monsoon: मॉन्सूनची आगेकूच!

APMC Facilities Issue: हळदीच्या आवकेत वाढ, मोजमापासाठी जागा अपुरी

Onion Storage Policy Issue: कांदा साठवणुकीच्या धोरणावर संशयाचे सावट

Paraquat Dichloride Ban: पॅराक्वॉट डाय-क्लोराइडवर देशव्यापी बंदीची तयारी

Maharashtra Rain Forecast: विदर्भ, मराठवाड्यात वादळी पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT