Sangli Currant Farmers agrowon
ॲग्रो विशेष

Sangli Currant Farmers : सांगली, तासगाव येथील बेदाणा सौदे चार दिवस बंद, शेतकरी अडचणीत

Sangli Farmers : अडत्यांनी सांगली, तासगाव येथील बेदाणा सौदे चार दिवस बंद ठेवले होते. ते पुन्हा सुरू झाले आहेत.

sandeep Shirguppe

Grapes In Sangli : सांगली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात द्राक्ष आणि बेदाण्याचा मोठा व्यापार होतो पंरतु मागच्या काही काळात बेदाणा व्यापाऱ्यांवर मोठं संकट आलं आहे. बेदाणा व्यापाऱ्यांकडे सांगली व तासगावच्या अडत्यांची मोठी रक्कम अडकली आहे. अडत्यांसह शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे.

यातूनच अडत्यांनी सांगली, तासगाव येथील बेदाणा सौदे चार दिवस बंद ठेवले होते. ते पुन्हा सुरू झाले आहेत. त्यामुळे अडते व शेतकरीही संकटात सापडले आहेत. सांगली, तासगाव येथे सौद्यात एकावेळी तीन हजार टन बेदाण्यांची आवक होत आहे.

सांगलीत बुधवारी आणि शुक्रवारी, तर तासगावमध्ये सोमवार, गुरुवार आणि शनिवारी बेदाणा सौदे होत आहेत. बेदाण्याचा हंगाम सुरू असल्याने आवकही मोठ्या प्रमाणात असून शेतकऱ्यांना पैशांची आवश्‍यकता असल्याने तेही विक्रीसाठी आणत आहेत.

महिन्याला दोन्ही ठिकाणी ५१ हजार टन बेदाण्याची विक्री होत आहे. फेब्रुवारीपासून व्यापाऱ्यांनी अडत्यांची मोठी रक्कम थकविली आहे. व्यापाऱ्यांकडून अडत्यांना ४० दिवसांत पैसे मिळाले पाहिजेत, असा नियम सांगली, तासगाव बाजार समितीने केला आहे. मात्र तीन महिने झाले, तरीही व्यापाऱ्यांकडून अडत्यांना पैसे मिळाले नाहीत.

पैशांसाठी अडत्यांनी व्यापाऱ्यांकडे तगादा लावल्यानंतर बेदाणा खराब असल्याचे कारण देत व्यवहार रद्द करण्याची धमकी दिली जात आहे. व्यापाऱ्यांच्या या भूमिकेला कंटाळून अडत्यांनी चार दिवस बेदाणा सौदेच बंद केले. व्यापाऱ्यांनी पैसे दिल्यानंतरच सौदे सुरू करण्याची भूमिका अडत्यांनी घेतली होती. त्यानंतर बैठक घेऊन पुन्हा सौदे सुरू झाले आहेत.

बेदाणा सौदे केवळ तीन-चार दिवस बंद होते. ते पूर्ववत सुरू झाले आहेत. व्यापाऱ्यांनी बेदाणा खरेदी केला. मात्र तो उचललेला नाही. व्यापाऱ्यांनी खरेदी केलेला माल तातडीने उचलला पाहिजे, तरच पुढील लिलाव सुरळीत होतील.

-महेश चव्हाण, सचिव, सांगली बाजार समिती

बेदाण्याचे अर्थकारण

सांगली, तासगावातील सौद्यांत महिन्याला ५१ हजार टन बेदाण्याची उलाढाल

तीन महिन्यांत एक लाख ५३ हजार टन उलाढाल

बेदाण्यास सरासरी १२० रुपये किलो दर

एक हजार ८३६ कोटी रुपयांची उलाढाल

नियमानुसार ४० दिवसांत अडत्यांना पैसे देण्याचा नियम

व्यापाऱ्यांनी फेब्रुवारीची रक्कम थकवली

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disability Certificate Verification: दिव्यांग प्रमाणपत्राची टक्केवारी चाळीस टक्क्यांपेक्षा पेक्षा कमी

Summer Irrigation: उन्हाळी सिंचनातून हजारो हेक्टरला दिलासा

MLA Sanjay Puram: धान खरेदीचे उद्दिष्ट वाढविण्याची मागणी

Radhakrishna Vikhe Patil: नांदूर मध्यमेश्वरला शेती नापीक होण्याच्या प्रश्नावर करणार उपाय

Minor Irrigation Tax: पाटबंधारे विभागाने तातडीने ‘मायनर कर’ वसुली थांबवावी

SCROLL FOR NEXT