Sugarcane Cultivation  Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Cultivation : सांगली जिल्ह्यात उसाची ३१ हजार हेक्टरवर लागवड

Sugarcane Season : सप्टेंबरच्या मध्यापासून पावसाने उघडीप दिली. त्यामुळे शेतकऱ्यांनी आडसाली आणि पूर्व हंगामी ऊस लागवडीचे नियोजन केले. त्यामुळे पुन्हा शिवारात ऊसलागवड करण्याची लगबग सुरू झाली.

Team Agrowon

Sangli News : जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या चार महिन्यांत मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे आडसाली हंगामातील ऊस लागवडीस अडथळे निर्माण झाले. अशा परिस्थितीतही शेतकऱ्यांनी ३१ हजार ४२६ हेक्टरवर उसाची लागवड केली आहे. तसेच मॉन्सूनोत्तर पावसाचा फटका पूर्व हंगामातील लागवडीला बसला आहे. सततच्या पावसामुळे वाफसा नसल्याने ऊस लागवड खोळंबली आहे.

जिल्ह्यातील कृष्णा आणि वारणा नदीकाठच्या भागात ऊस लागवड मेपासून सुरू झाली. जून महिन्यापासून पावसाला प्रारंभ झाला. जून ते सप्टेंबर या महिन्यांत मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शेतात पाणी साचून राहिले. परिणामी शेतकऱ्यांना आडसाली हंगामातील उस लागवड करणे मुश्कील झाले.

सप्टेंबरच्या मध्यापर्यंत २२ हजार ७५४ हेक्टरवर उसाची लागवड झाली. परंतु सततच्या पावसामुळे उसाची वाढ खुंटली. अपेक्षित फुटवे मिळाले नाहीत. तुटाळी झाली. उगवण क्षमता कमी झाली असल्याने शेतकरी हतबल झाला असल्याचे चित्र आहे.

दरम्यान, सप्टेंबरच्या मध्यापासून पावसाने उघडीप दिली. त्यामुळे शेतकऱ्यांनी आडसाली आणि पूर्व हंगामी ऊस लागवडीचे नियोजन केले. त्यामुळे पुन्हा शिवारात ऊसलागवड करण्याची लगबग सुरू झाली. मात्र, परतीचा पाऊस सुरू झाला.

अनेक भागांत जोरदार मॉन्सूनोत्तर पाऊस झाला. त्यामुळे पुन्हा शेतात पाणी साचले, वाफसा नाही. त्यामुळे ऊस लागवडीवर पावसाचे पाणी फिरले. परिणामी ऊस लागवड खोळंबली. जिल्ह्यात सध्या ३१ हजार ४२६ हेक्टरवर उसाची लागवड झाली आहे.

जिल्ह्यातील जत, आटपाडी, कवठेमहांकाळ, खानापूर या तालुक्यांत पूर्व हंगामातील उसाची लागवड होते. परंतु परतीच्या पावसामुळे खरिपातील पिकांची काढणी रखडल्याने या तालुक्यात पूर्व हंगामातील ऊसलागवड करण्यासाठी शेतकरी पुढे आले नाहीत.

तालुकानिहाय ऊसलागवड क्षेत्र (हेक्टरमध्ये)

तालुका क्षेत्र

मिरज २,२४०

जत ३३

खानापूर ३,०५५

वाळवा ८,११८

तासगाव २,३८१

शिराळा ८७०

आटपाडी ४८१

कवठेमहांकाळ १३३

पलूस ९,८६९

कडेगाव ३,२४६

एकूण ३१,४२६

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cashew Subsidy : काजू अनुदान अर्ज भरण्यासाठी राहिले केवळ चार दिवस

NCP Sharad Pawar Candidate 3rd List : कृषिमंत्र्यांच्या विरोधात शरद पवारांनी शिलेदार मैदानात उतरवला; परळीतून राजेसाहेब देशमुख यांना उमेदवारी

Water Storage : नंदुरबार जिल्ह्यातील अनेक बंधारे भरले; भूजल पातळी वाढण्याची शक्यता

Agriculture Theft : शिवारातून कापसासह केळी, शेती यंत्रणांची चोरी

NCP Ajit Pawar Group : बीडमध्ये अजित पवार गटाची चिंता वाढली?; पाटोदा बाजार समिती घोटाळा प्रकरणात बांगर यांना अटक

SCROLL FOR NEXT