Jute Cultivation  Agrowon
ॲग्रो विशेष

Jute Cultivation : कमी श्रमात अधिक उत्पन्नासाठी तागाची लागवड

Team Agrowon

Latest Agriculture News : रब्बी हंगामात पारंपरिक पिकांच्या लागवडीला फाटा देत कमी श्रमात अधिक उत्पादन देणाऱ्या नगदी पिकांची लागवड वाढली आहे. पेरणीनंतर तीन महिन्यांनी काढणी केली जाणारे हिरवे खत म्हणून प्रसिद्ध असलेल्या ताग (तागडा) लागवडीकडे शेतकरी वळत आहेत. तागाचा खत म्हणून वापर न करता बियांच्या विक्रीकडे शेतकऱ्यांचा जोर आहे.

दरवर्षी विक्रीच्या दरात वाढ होत असल्याने ताग लागवडीच्या क्षेत्रात वाढ होत आहे. पालघर तालुक्यात सुमारे ६० हेक्टर क्षेत्रात तागाची लागवड करण्यात आली आहे. यंदा दोनशे क्विंटल तागाचे उत्पादन अपेक्षित आहे. पालघर तालुक्याच्या पूर्व भागात रब्बी हंगामात पारंपरिक पद्धतीने तूर, तीळ आणि वालाची लागवड घरगुती वापरासाठी केली जाते.

उत्पन्नाची हमी नसल्याने लागवडीनंतर मशागत आणि खतांचा वापर करावा लागत असल्याने शेतकऱ्यांचा कल नगदी पिकांच्या लागवडीकडे आहे. गेल्या काही वर्षांपासून कमी श्रमात अधिक उत्पादन देणाऱ्या आणि जमिनीची पोषकता वाढवणाऱ्या ताग लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे.

ताग पिकाला हिरवळीचे खत म्हणूनही ओळखले जाते. लागवडीनंतर तागाला बाहेरून नत्र देण्याची गरज भासत नाही. तागाचे रोप नत्राची गरज स्वतः भागवतो. लागवडीनंतर दीड ते दोन फूट उंच झाल्यानंतर उभ्या पिकावर नांगर फिरवून तागाच्या रोपांचा वापर हिरवळीचे खत म्हणून वापर होतो. यंदा पालघर तालुक्यातील ताग लागवडीचे क्षेत्र ६० हेक्टर असून दोनशे क्विंटल तागाचे उत्पादन होण्याची शक्यता कृषी विभागाने वर्तवली आहे.

दोन हेक्टर क्षेत्रात २० किलो बियाण्याची पेरणी केली. नांगरणीसाठी सहा हजार रुपयांचा खर्च आला असून १२ ते १५ क्विंटल उत्पादनाची शक्यता आहे. पेरणी, काढणी आणि नांगरणी खर्च वगळता ६५ ते ७० हजार रुपये उत्पन्न मिळेल.
- देवेंद्र पाटील, शेतकरी, गिराळे
रब्बी हंगामात नगदी पीक असलेल्या तागाची लागवड वाढवण्यासाठी कृषी विभागाकडून प्रयत्न केले जात आहेत. यंदा ६० हेक्टरवर लागवड करण्यात आली असून येत्या हंगामात लागवडीचे क्षेत्र १०० हेक्टरपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट आहे.
- तरुण वैती, कृषी अधिकारी, पालघर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Crop : वाढलेल्या सोयबीनमध्ये शेंगांचा शोध

Agricos Welfare Society : ‘कृषी’च्या विद्यार्थ्यांकडून सेवाभावी संस्थेला मदत

E-Peek Pahani : छप्पन टक्के शेतकऱ्यांनी नोंदविली ई-पीकपाहणी

Crop Damage Compensation : नांदेडमधील शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई

Integrated Agriculture : एकात्मिक शेती पद्धतीच्या यशस्वी मॉडेलचा प्रसार व्हावा

SCROLL FOR NEXT