Turmeric Research Center Agrowon
ॲग्रो विशेष

Turmeric Research Center : वसमतच्या हळद संशोधन केंद्रामध्ये होणार ३२ वाणांची लागवड प्रात्यक्षिके

Turmeric Update : वसमत येथील बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद) संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्या प्रक्षेत्रावर हळदीच्या ३२ वाणांची लागवड प्रात्यक्षिके घेण्यात येणार आहेत, अशी माहिती खासदार तथा हळद संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे अध्यक्ष हेमंत पाटील यांनी दिली.

Team Agrowon

Hingoli Turmeric News : वसमत येथील बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद) संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्या प्रक्षेत्रावर हळदीच्या ३२ वाणांची लागवड प्रात्यक्षिके घेण्यात येणार आहेत, अशी माहिती खासदार तथा हळद संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे अध्यक्ष हेमंत पाटील यांनी दिली.

नांदेड येथे रविवारी (ता. २५) आयोजित शासन आपल्या दारी उपक्रमांतर्गत लावण्यात आलेल्या वसमत येथील हळद संशोधन केंद्राच्या दालनाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Minister of State Eknath Shinde) यांनी भेट दिली.

या वेळी खासदार पाटील यांनी हळद या पिकांवरील संशोधनासाठी हळदीच्या ३२ वाणांची लागवड करण्यात येणार आहे. देशातील हा पहिलाच प्रयोग असल्याचे सांगितले.

या वेळी कृषिमंत्री अब्दुल सत्तार, ग्रामविकासमंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन, उद्योगमंत्री उदय सामंत, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार संतोष बांगर, खासदार प्रताप पाटील चिखलीकर, हळद संशोधन केंद्राचे व्यवस्थापकीय संचालक दौलत चव्हाण, रमेश देशमुख आदी अधिकारी उपस्थित होते.

या वेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, की हळद संशोधन केंद्रासाठी शासनातर्फे शंभर कोटी रुपये निधी दिला आहे. यापुढे कामाची व्याप्ती वाढत राहील त्याप्रमाणे आणखी निधी नक्कीच देता येईल.

या वेळी शेतकऱ्यांनी नैसर्गिक पद्धतीने उत्पादित हळद पावडर, अमोधा (आंबे हळद) हळदीचे लोणचे, चिप्स आदी मुख्यमंत्र्यांना भेट देण्यात आले. या वेळी हळद पिकामध्ये उल्लेखनीय कार्य आणि वेगवेगळे प्रयोग केलेले शेतकरी संदीप डाकुलगे, लक्ष्मीकांत मोरे, माधव बनगर, विश्‍वनाथ होळगे, प्रकाश देशमुख, तुकाराम गावंडे, भगवान इंगोले यांचा सत्कार करण्यात आला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Union Budget 2026: कृषी शिक्षण, संशोधनावरील तरतूद वर्षागणिक तोकडीच

Bharat-VISTAAR AI: अर्थसंकल्पातून 'भारत विस्तार एआय'ची घोषणा, याचा शेतकऱ्यांना कसा होईल फायदा?

Sandlwood Cultivation : चंदन लागवडीसाठी अर्थसंकल्पात तरतूद; पाच राज्यांमध्ये चंदनाची सर्वाधिक लागवड

Groundwater Management: सर्व विभागाच्या समन्वयातून भूजल व्यवस्थापनाची गरज

Union Budget 2026: कृषी, ग्रामीण उद्योगासह शेतकरी हिताचा संकल्प

SCROLL FOR NEXT