Sugarcane Season Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Season 2024 : ‘हेमरस’ची वाढली गाळप क्षमता’

Sugarcane Crushing : राजगोळी खुर्द (ता. चंदगड) येथील ओलम (हेमरस) साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा प्रारंभ झाला. शनिवारपासून तोडणी व वाहतूक यंत्रणा कामाला लागली आहे.

Team Agrowon

Kolhapur News : राजगोळी खुर्द (ता. चंदगड) येथील ओलम (हेमरस) साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा प्रारंभ झाला. शनिवारपासून तोडणी व वाहतूक यंत्रणा कामाला लागली आहे.

ऊस गाळपाला प्रत्यक्षात सुरुवात झाल्याने स्थानिक वाहतूक व तोडणी मजुरांनी ऊस तोडणीला सुरुवात करावी, असे आवाहन कारखान्याचे बिझनेस हेड भरत कुंडल यांनी करून कारखान्याची गाळप क्षमता वाढवल्याने बस पाळीचा प्रश्न सुटणार असल्याचे सांगितले.

कारखान्याच्या गळीत हंगामाचे मोळी पूजन ७ नोव्हेंबरला झाले. चंदगड, आजरा व गडहिंग्लज तालुक्यांतील कारखान्यांच्या शेती कार्यालयातील कर्मचारी शेतकरी व ऊस तोडणी मजुरांच्या भेटी घेऊन ऊस तोडणीसाठी आग्रह करत आहेत.

शनिवारपासून ३० टक्के प्रत्यक्ष ऊस तोडणीची यंत्रणा कामाला लावली आहे. भात सुगीच्या हंगामात ऊस तोडणी मजूर गुंतल्याने पूर्ण क्षमतेने तोडणी यंत्रणा सुरू करण्यात करखाना प्रशासनाला अडचणी येत आहेत.

यावर्षी नोव्हेंबरपर्यंत परतीचा पाऊस झाल्याने अजूनही शेतातून पाणी आहे. त्यामुळे रस्त्याकडील व माळरानावरील ऊस तोडणीच्या कामाला सुरुवात झाल्याचे कुंडल यांनी सांगितले.

गडहिंग्लज विभागातील सर्वच शेती कार्यालयांतून कर्मचाऱ्यांनी स्थानिक तोडणी मजुरांना व वाहतूकदारांना ऊस तोडणीच्या सूचना दिल्या आहेत. सध्या बीडच्या ऊस टोळ्यांवर कारखाना सुरू आहे. स्थानिक ऊस टोळ्यांनीही लवकरात लवकर कामाला लागावे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Panchnama: शेतकऱ्यांना कागदपत्रांच्या अटीत अडकवू नका; पिकांचे सरसकट १०० टक्के पंचनामे करा, कैलास पाटील यांची मागणी

Produce Quality Management: जागतिक, भारतीय मानकानुसार गुणवत्ता तपासणारी यंत्रे

Drought Management: लोकसहभागातून संकटावर मात..

Masala Business Success: अस्सल चवीच्या रिठे मसाल्यांनी मिळविली ग्राहकांची पसंती

Collective Farming Model: एकत्र आलो म्हणून पुढे गेलो...

SCROLL FOR NEXT