Sand  Agrowon
ॲग्रो विशेष

Illegal Sand Mining : अवैध वाळू वाहनांची जिल्हाधिकारी कार्यालयात गर्दी

Illegal Sand Update :जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाची जागा असलेल्या प्रशासकीय इमारतीत अवैध वाळू वाहतूक करणारी सुमारे शंभरपेक्षा अधिक वाहने जप्त करून ठेवली आहेत.

Team Agrowon

Illegal Sand Jalgaon : जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाची जागा असलेल्या प्रशासकीय इमारतीत अवैध वाळू वाहतूक करणारी सुमारे शंभरपेक्षा अधिक वाहने जप्त करून ठेवली आहेत. गेल्या तीन वर्षांपासून ही वाहने जप्त केली असून, दर वर्षी त्यात भर पडत आहे.

जिल्हा प्रशासन जप्त केलेल्या वाहनचालकांकडून दंड वसूल करणार अन् केव्हा ती जागा मोकळी होणार, याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत.

वाळूचे लिलाव झालेले नसताना नदीपात्रातून वाळूची चोरी करणे, क्षमतेपेक्षा अधिक वाळू भरून वाहतूक करणे आदी कारणांनी महसूल, पोलिस पथकाच्या छाप्यात अवैध वाहतूक करणारी वाहने जप्त करण्यात आली.

दोन ते तीन वर्षांपासून वाळूसह जप्त केलेल्या वाहनांना दंड चारपट लागतो. हा दंड भरण्यापेक्षा नवीन वाहन घेणे डंपर, ट्रक्टर, ट्रकमालकांना परवडते. यामुळेच जप्त केलेली वाहने दंड न भरता तेथेच पडू देणे हा पर्याय वाहनमालकांनी निवडलेला दिसतो. यामुळेच तीन वर्षांत शंभरापेक्षा अवैध वाळू वाहतुकीची जप्त केलेली वाहने आहे तशीच आहेत.

वाळू चोरी अधिनियम कायद्यानुसार अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांना दंड लाखांच्या घरात जातो. वाहन जप्त केल्यानंतर तहसीलदार कार्यालयातर्फे कायदेशीर बाब म्हणून संबंधित वाहनांच्या मालकांना नोटिसा देऊन दंड भरण्यास सांगितले जाते.

त्यांनी तो न भरल्यास काही वेळ वाट पाहून त्या वाहनांचा लिलाव करून दंड वसूल केला जातो. मात्र, वाहन जप्त केलेले वाहनधारक दंड भरण्यास अनुकूल नसतात. यामुळे अशा वाहनांचा लिलाव केला जातो. मात्र, कोरोनापासून अशा वाहनांचा लिलाव झाला नसल्याचे चित्र आहे.

पोलिसांची नियुक्ती

कोरोनापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयातून वाळूची जप्त केलेली वाहने चोरीस गेली आहेत. त्याची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी प्रशासकीय इमारतीत दोन पोलिस नेहमी बंदोबस्ताला असतात. मात्र, ही वाहने आता भंगार होत असून, अनेकांची टायर पंक्चर झाली आहेत. अनेकांमध्ये साप, विंचू, पालींचा वावर आहे.

जप्त केलेल्या अवैध वाळूच्या वाहनांना दंड आकारला जातो. वाहन जप्त केले जाते. दंड न भरल्यास काही कालावधीत वाहनांचा लिलाव होतो. तशी नोटीस संबंधित वाहनमालकाला दिली जाते. जप्त केलेल्या वाहनांच्या लिलावाबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल.
विशाल सोनवणे, प्रभारी तहसीलदार, जळगाव

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Update: कोकण, घाटमाथा, विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा अंदाज

Drought Situation: दुष्काळस्थितीत यंत्रणांनी सतर्क राहावे : कृषिमंत्री भरणे

Ghodganga AGM Controversy: ‘घोडगंगा’च्या सभेत घोषणाबाजीने गोंधळ

Illegal Water Extraction: तलाव आटले, तरीही अवैध पाणीउपसा सुरू

Farmers Protest: २३ सप्टेंबरला मंत्र्यांना काजू, बदाम पाठवून राज्यभर आंदोलन, किसान सभेची घोषणा

SCROLL FOR NEXT