Seed Distribution  Agrowon
ॲग्रो विशेष

Paddy Seed : भात बियाणे खरेदीसाठी गर्दी

Kharif Season 2025 : पंचायत समितीच्या कृषी विभागाच्या वतीने गुरुवारी (ता. २९) महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाकडून दिल्या जाणाऱ्या अनुदानित भातपिकांच्या बियाण्यांचे वितरण करण्यात आले.

Team Agrowon

Palghar News : पंचायत समितीच्या कृषी विभागाच्या वतीने गुरुवारी (ता. २९) महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाकडून दिल्या जाणाऱ्या अनुदानित भातपिकांच्या बियाण्यांचे वितरण करण्यात आले.

दरम्यान, कृषी विभागाच्या भोंगळ कारभारामुळे जिल्हा परिषदेच्या शाळेत नोंदणीसाठी शेतकऱ्यांची एकच गर्दी झालेली पाहायला मिळाली. या वेळी अखेर बियाणे न घेताच अनेक शेतकऱ्यांवर घरी परतण्याची वेळ आल्याने कृषी विभागाच्या या भोंगळ कारभाराचा नाहक त्रास अनेकांना सहन करावा लागला.

यावर्षी पाऊस मेमध्येच दाखल झाल्याने शेतकऱ्यांची चांगलीच धावपळ झाली आहे. शेतीची अवजारे आणि बी-बियाणे जमा करण्याचे काम शेतकऱ्यांनी हाती घेतले आहे. आधीच बियाण्यांच्या व खतांच्या किमती वाढलेल्या असताना, सरकारकडून बियाण्यांचे वाटप करण्यात येत असल्याने शेतकऱ्यांना थोडाफार दिलासा मिळतो.

पंचायत समितीकडून बियाणे वाटपाला सुरुवात केली असता शेतकऱ्यांची अक्षरशः झुंबड उडाली. कृषी विभागाच्या नियोजनशून्य कारभारावर कुणबी सेनेने नाराजी व्यक्त केली.

यावर आक्रमक पवित्रा घेत कुणबी सेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रदीप हरड यांनी वाटपाची सविस्तर माहिती देण्याची मागणी गटविकास अधिकाऱ्यांकडे केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Plastic Eating in Cows: जनावरांनी प्लास्टिक, खिळे खाल्ले तर काय होईल? जाणून घ्या आवश्यक उपाय

Rural Governance: मुदत संपणाऱ्या ६५८ ग्रामपंचायतींवर आता प्रशासक

Tur Prices: सोलापूर जिल्ह्यात तूर अन्‌ सोयाबीनचे दर हमीभावाच्या वर!

Namo Installment : अडीच महिने उलटूनही नमोचा हप्ता मिळेना

Maharashtra Government: ७ फेब्रुवारीला उद्योग, कारखान्यांतील कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी जाहीर

SCROLL FOR NEXT