Agriculture Electricity  Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Electricity : पुरेशा विजेअभावी सहाशे एकारांवरील पिके धोक्यात

Crop Damage : लांबोटी (ता. मोहोळ) येथील वीजवितरण कंपनी अभियंत्याच्या दुर्लक्षामुळे अन् सतत खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे खुनेश्वर, हिंगणी (निपाणी) व भांबेवाडी शिवारातील सहाशे एकराहून अधिक क्षेत्रावरील पिके जळू लागली आहेत.

Team Agrowon

Solapur News : लांबोटी (ता. मोहोळ) येथील वीजवितरण कंपनी अभियंत्याच्या दुर्लक्षामुळे अन् सतत खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे खुनेश्वर, हिंगणी (निपाणी) व भांबेवाडी शिवारातील सहाशे एकराहून अधिक क्षेत्रावरील पिके जळू लागली आहेत.

याबाबत लांबोटी येथील अभियंता शरद मारकड यांच्याशी यांनी संपर्क करण्याचे टाळले. खुनेश्वर, भांबेवाडी व हिंगणी (निपाणी) या गावांना लांबोटी व भांबेवाडी येथील सबस्टेशन मधून विद्युत पुरवठा केला जातो. सध्या उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे जमिनीतील ओल कमी होत आहे.

त्यामुळे पिकांना पाण्याची नितांत गरज आहे. परंतु सतत खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे विद्युत पंप चालू केल्यास पिकांत पाणी पोहोचेपर्यंत लाइट गायब होते. त्यामुळे पिके पाण्याअभावी जळत आहेत. परिणामी शेतकऱ्यांचे पाण्याअभावी मोठ्याप्रमाणात नुकसान होत आहे.यंदा समाधानकारक पाऊस झाल्यामुळे बोअर व विहिरींना चांगले पाणी आहे.

परंतु वीजपुरवठा बंद असल्यामुळे विद्युतपंप बंद आहेत. वस्तीवरील जनावरांना पिण्यासाठी पाणी मिळणे कठीण झाले आहे. शेतीपूरक दुग्ध व्यवसायाला आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. लांबोटी येथील सबस्टेशनमध्ये नवीन रोहित्र बसविल्यामुळे विद्युत पुरवठा क्षमता वाढली आहे.

खुनेश्वर शिवारातील काही भाग लांबोटी सबस्टेशनला जोडावा व हिंगणी शिवारातील नरखेड सबस्टेशनला जोडल्यास विद्युत पुरवठा सुरळीत होईल, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

लांबोटी वीजवितरण कंपनी अभियंता शरद मारकड यांना दीड महिन्यापूर्वी खुनेश्वर, हिंगणी (निपाणी) व भांबेवाडी शिवारातील खंडित व विस्कळित होणाऱ्या वीजपुरवठा संदर्भात पूर्वसूचना दिली होती. तरीही उपाययोजना केली नाही. या तीन गावातील पिके जळू लागली आहेत
- केशव वाघचौरे, सरपंच, भांबेवाडी
वीजवितरण कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे खुनेश्वर व हिंगणी शिवारातील रब्बी हंगामातील व बागायतीची पिके वाढत्या उन्हामुळे जळू लागली आहेत. परिणामी वीजवितरण कंपनीमुळे शेतकऱ्याच्या तोंडाचा घास हिरवला आहे.
- ज्ञानेश्वर माने, शेतकरी
सततच्या खंडित वीज पुरवठ्यामुळे सध्या या भागातील पिके जळू लागल्याने विद्युत पुरवठा सुरळीत न झाल्यास वीज वितरण कंपनीच्या विरोधात उपोषण करण्याचा करणार आहे.
- गणेश झाडे, जिल्हा उपाध्यक्ष, भाजप युवा मोर्चा

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाभार्थ्यांवर सरकारची कारवाई; अनुदानाची वसुली, तुरुंगवासाचीही शक्यता?

Skill Training Centre: मराठवाड्यात सुरू होणार अत्याधुनिक कौशल्य प्रशिक्षण केंद्र

Bio Tech Farming : ‘के. बी. बायो’च्या वनस्पतिजन्य पीक संरक्षण तंत्रज्ञानाला मान्यता

Land Records Update: जमीन मालकी कायद्याची सिंधुदुर्गातून अंमलबजावणी

Khandesh Rain Update: खानदेशात पावसाची विश्रांती

SCROLL FOR NEXT