Banana Crop Agrowon
ॲग्रो विशेष

Summer Heat : वाढत्या तापमानामुळे पिकांना फटका सुरूच

Crop Damage : खानदेशात कमाल तापमान सतत वाढत आहे. यामुळे केळीसह पपई, कलिंगड, खरबूज, भाजीपाला पिकांना फटका बसत आहे.

चंद्रकांत जाधव ः अॅग्रोवन वृत्तसेवा

Jalgaon News : खानदेशात कमाल तापमान सतत वाढत आहे. यामुळे केळीसह पपई, कलिंगड, खरबूज, भाजीपाला पिकांना फटका बसत आहे. पिकांना मुबलक पाणी देवूनही पिके माना टाकत आहे.

निसवलेल्या किंवा काढणीवर असलेल्या ज्या केळी बागांत प्लॅस्टिक मल्चिंग आहे, त्या बागांत झाडे मोडण्याचा, घट सटकून नुकसानीची समस्या अधिक आहे. जळगाव, धुळे व नंदुरबारात तापमान सतत वाढले आहे. कमाल तापमान मध्यंतरी ४४ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले होते. सध्यादेखील तापमान ४३ अंश सेल्सिअसपर्यंत नोंदविले जात आहे.

सकाळी नऊ ते रात्री नऊपर्यंत उष्णता असते. उष्ण झळांमुळे पिकांची अन्नद्रव्य ग्रहण क्षमता खालावली आहे. पीकवाढीवर परिणाम होत आहे. केळीसह पपई, भाजीपाला, कलिंगड पिकांना मोठा फटका बसत आहे. कलिंगडाची फळे होरपळून पिवळी, काळी पडत आहेत. ती खरेदीस व्यापारी नकार देत आहेत.

गिरणा पट्टा, अनेर नदीचा भाग, पांझरा नदीचे क्षेत्र व सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या सर्वच परिसरात पपई, भाजीपाला, केळी पिकविणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रमाण मोठे आहे. शेतकरी काही दिवसांपासून केळीचे खोड लागवड करण्यापासून त्याची रासायनिक व सेंद्रिय खते देऊन त्याचे पालन पोषण करीत आहेत.

केळी पिकाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे आर्थिक प्रश्‍न मार्गी लागतात. मात्र यंदा वाढलेल्या तापमानामुळे पपई, कलिंगड, बागा जळत आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. परिसरात केळीची लागवड मोठ्या प्रमाणात झाली आहे. सध्या पारा ४० ते ४५ अंशांपर्यंत गेला आहे व हवेत प्रचंड उष्णतेची लाट निर्माण झाली आहे.

नुकसान वाढतेच

वाऱ्यामुळे पपई, कलिंगड, केळीची पाने पूर्णतः फाटत आहेत. उष्णतेमुळे संपूर्ण केळीबागा जळताना दिसत आहेत. यात विहिरी व कूपनलिकांची पाणी पातळी खोल जात असल्याने पिकाला पाणी देणे अनिश्‍चित झाले आहे.

पिकला पाणी कमी पडल्यामुळे पिके जळू लागली आहेत. शेतकऱ्यांनी काढलेला या वर्षीचा फळपीक विम्यासाठी ते उष्णतेच्या निकषात पात्र ठरत असून, लवकरात लवकर विमा कंपनीने केळी पिकाचा पंचनामा करून नुकसानभरपाई देण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Solar Pump Complaint : आता महावितरणच्या अॅपवर शेतकऱ्यांना सौर कृषी पंपाची तक्रार करता येणार

Monsoon Rain: शनिवारपासून पावसाचा जोर वाढणार; कोकण, घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा अंदाज कायम

Rain Crop Damage : मॉन्सूनपूर्व पावसामुळे पिके, फळबागांचे २१ कोटींचे नुकसान

Irrigation Management : शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत पाणी पोहोेचले तरच प्रकल्पांचा उपयोग

Water Storage Marathwada : मराठवाड्यातील मोठ्या प्रकल्पातील उपयुक्त पाणीसाठा ७९ टीएमसीवर

SCROLL FOR NEXT