Pune News: दिवसेंदिवस वाढणाऱ्या निविष्ठांच्या किमती आणि वाढता उत्पादन खर्च ध्यानात घेता, सहकार विभागाने २०२५-२६ या वर्षासाठीच्या पीककर्ज मर्यादेत भरीव वाढ केली आहे. यामध्ये १६ ते १६१ टक्क्यांपर्यंत वाढ केली असून, यामध्ये सर्वाधिक १६१ टक्क्यांची वाढ स्ट्रॉबेरीसाठी, तर सर्वांत कमी १६ टक्के वाढ मक्यासाठी करण्यात आली आहे.
सहकार आयुक्त दीपक तावरे यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय तांत्रिक समितीची बैठक नुकतीच झाली. यात कृषी क्षेत्रातील विविध घटकांच्या दरवाढीचा विचारविनिमय करण्यात आला. यात निविष्ठांच्या किमती, मंजुरी, इंधन दरवाढ आदी घटकांवर चर्चा झाली. यानुसार विविध २४ पिकांच्या पीककर्ज मर्यादेत वाढीचा निर्णय घेण्यात आला. यात १६ ते १६१ टक्क्यांपर्यंत प्रति हेक्टरी वाढीस मान्यता देण्यात आली.
विविध पिकांची कर्जमर्यादा पुढीलप्रमाणे (लाख रुपयांत)
पीक २०२४-२५ मधील मर्यादा २०२५-२६ मधील वाढ कर्जदारातील वाढ टक्के
ऊस (आडसाली) १,३२,७८८ ते १,६९,९०४ १,६५,००० ते १, ८०,००० २४
ऊस (पूर्वहंगामी) १,१५,०२७ ते १,५५,०४६ १,४५,००० ते १,७०,००० २६
ऊस (सुरू) १,१४,४८५ ते १,५७,८७५ १,४५,००० ते १,७०,००० २७
ऊस (खोडवा) ९९,६६७ ते १,२३,५८८ १,२५,००० ते १,६०,००० २५
कापूस जिरायत ५१,००० ते ७०,८७५ ६०,००० ते ७५,००० १८
खरीप भात ४६,९८३ ते ६५,१६३ ५८,००० ते ७५,००० ३०
सोयाबीन ४३,५४३ ते ६६,१६३ ५८,००० ते ७५,००० ३३
तूर (जिरायत) ३७,२१८ ते ४७,३६१ ४७,००० ते ५४,००० २६
कांदा (रब्बी) ६९,४१७ ते १,१४,२१३ ९०,००० ते १,२०,००० ३०
हळद १,०५,५४७ ते १,४३,२३८ १,३०,००० ते १,७०,००० २३
केळी ९१,२०८ ते १,५१,७२८ १,१५,००० ते १,६०,००० २६
खरीप ज्वारी (बागायत) २८,६५८ ते ५२७४५ ३६,००० ते ५६,००० २६
रब्बी ज्वारी (बागायत) ३०,३४६ ते ५०,९५५ ३६,००० ते ५४,००० १९
रब्बी ज्वारी (जिरायत) २९,०९६ ते ४८,५२० ३६,००० ते ५४,००० २४
बाजरी (बागायत) २७,१२० ते ५१,२१० ३८,००० ते ५४,००० ४०
बाजरी (जिरायत) २४,४०० ते ४४,९५० ३२,००० ते ४९,००० ३१
मका (बागायत) ३८,७०५ ते ५८,८३८ ४५,००० ते ६५,००० १६
आंबा (हापूस) १,५०,००० ते २,२५,००० २,००,००० ते २,५०,००० ३३
आंबा (केसर) १,४०,००० ते १,८५,००० १,८०,००० ते २,४०,००० २९
अंजीर ६०,००० ते १,२५,००० ९०,००० ते १,६५,००० ५०
काजू १,१०,००० ते १,७६,००० १,६५,००० ते १,९३,००० ५०
स्ट्रॉबेरी ६९,००० ते ७४,००० १,८०,००० ते ४,५०,००० १६१
टोमॅटो ७६,२५० १,२०,७३७ २६
रेशीम किडे संगोपन ९८,००० ते १,३३,००० १४०,००० ते १,८५,०० ४३
दरवर्षी खते बियाणे यांच्या दरात वाढ होत आहे. यामुळे शेतकऱ्यांना पीककर्जामध्ये देखील वाढ होणे गरजेचे होते. ती वाढ सहकार विभागाने केली आहे. केलेली वाढ ही समाधानकारक असून, शेतकऱ्यांना ऐन खरिपात दिलासा देणारी आहे.संतोष वायकर, सचिव, राजुरी (ता. जुन्नर) विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.