Crop Insurance Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Insurance : रब्बीसाठी पीकविमा योजना लागू

Rabi Season 2024 : प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत रब्बी हंगाम सन २०२४-२५ मध्ये एक रुपयांमध्ये सर्व समावेशक पीक विमा योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.

Team Agrowon

Nanded News : प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत रब्बी हंगाम सन २०२४-२५ मध्ये एक रुपयांमध्ये सर्व समावेशक पीक विमा योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. ही योजना गहू (बागायती), ज्वारी (जि) व हरभरा या तीन पिकांसाठी लागू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत सहभागी होण्यासाठी हरभरा व गहू या पिकासाठी ता. १५ डिसेंबर, तर ज्वारीसाठी ३० नोव्हेंबर अंतिम मुदत असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्राने दिली.

कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ही विमा योजना ऐच्छिक आहे. पीक पेरणीपासून काढणीपर्यतचा कालावधी नैसर्गिक आग, वीज कोसळणे, गारपीट, वादळ, चक्रीवादळ, पूर, क्षेत्र जलमय होणे, आदी जोखीम यामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे. नांदेड जिल्ह्यातील गहू (बा), ज्वारी (जि), हरभरा या पिकांसाठी ही योजना लागू आहे.

एक रुपयांमध्ये या योजनेत शेतकऱ्यांना पिकांचा विमा भरता येणार आहे. गहु (बागायती) या पिकासाठी ४२ हजार ५०० रुपये विमा संरक्षित रक्कम आहे. यात नांदेड, अर्धापूर, मुदखेड, बिलोली, लोहा, कंधार, नायगाव, धर्माबाद, किनवट, हिमायतनगर, भोकर व हदगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना विमा भरता येईल.

ज्वारीसाठी (जि) ३३ हजार ७५० रुपये विमा संरक्षीत रक्कम आहे. या योजनेतंर्गत नांदेड, देगलूर, नायगाव, बिलोली, मुखेड, धर्माबाद, किनवट, हदगाव या तालुक्यातील शेतकऱ्यांना सहभाग घेता येईल. हरभरा पिकासाठी ३७ हजार ५०० रुपये विमा संरक्षीत रक्कम आहे.

यात नांदेड, अर्धापूर, मुदखेड, बिलोली, लोहा, कंधार, देगलूर, नायगाव, धर्माबाद, मुतोड, किनवट, माहुर, हिमायतनगर, भोकर, हदगाव, उमरी येथील शेतकऱ्यांना सहभागी होता येईल.

शेतकऱ्यांना अर्ज करण्याचे आवाहन

रब्बीतील प्रधानमंत्री पीक विमा योजना युनायटेड इंडिया इंशुरन्स कंपनी मार्फत राबविण्यात येणार आहे. कर्जदार व बिगरकर्जदार शेतकऱ्यांना पीक विमा उतरवण्याची अंतिम तारीख या ज्वारी जि. पिकासाठी ३० नोव्हेबर आहे. गहु बा. व हरभरा पिकासाठी १५ डिसेंबर आहे. अधिकच्या माहितीसाठी शेतकऱ्यांनी संबंधित तालुका कृषी अधिकारी किंवा जवळच्या बँकेशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ladki Bahin Yojana: लाडकी बहिणींना दोन हप्ते एकदम?; मार्च, एप्रिलचा ७३० कोटी निधी मंजूर

Soybean Seed Treatment: कमी पावसाच्या संकटात सोयाबीन लागवडीपूर्वीचे नियोजन कसे करावे?

Papaya Cultivation: पपई लागवड क्षेत्र १५ हजार हेक्टरवर पोहोचण्याचा अंदाज

Agrowon Podcast: कापसातील तेजी कायम; सोयाबीनमध्ये सुधारणा, कांदा दबावातच तर हळद-हरभरा स्थिर

Water Levels Drop: उन्हामुळे जलसाठ्यात झपाट्याने घट

SCROLL FOR NEXT