Shivsena (UBT) Protest Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Insurance : शिवसैनिकांचा राडा! अकोल्यातील पीक विमा कंपनीचे कार्यालय फोडले

Shivsena (UBT) Protest : पीक विम्याच्या मागणीसाठी शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरून विरोध करण्यास सुरूवात केली आहे. शिवसेनेच्या (ठाकरे गट) संतप्त शिवसैनिकांनी अकोल्यातील विमा कंपन्यांच्या कार्यालयाची तोडफोड केली आहे.

Swapnil Shinde

Akola News : अकोला जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई मिळावे, या मागणीसाठी शिवसेना (ठाकरे) आक्रमक झाली. शिवसैनिकांनी आज कौलखेड भागात असलेले पीकविमा कंपनीच्या कार्यालयाची तोडफोड केली.

अकोला जिल्ह्यात जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेत जमीन खरवडून गेली आहे. या नुकसानीची भरपाई म्हणून राज्य शासनाने हेक्टरी १३ हजार ६०० रुपये देण्याची यावी. तसेच त्यानंतर पडलेल्या पावसाच्या खंडामुळे सोयाबीन, कापूस पिकांचे नुकसान झाले आहे. या मागणीसाठी शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाल दातकर यांनी दोन दिवसांपासून अकोला येथे अन्नत्यात आंदोलन सुरू केले आहे.

पीकविम्याबाबत सरकारच्यावतीने अधिसूचना काढूनही दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात भरपाई जमा न झाल्याने शिवसैनिक संतप्त झाले. त्यांनी आज कौलखेड येथील एसडीएफसी अॅग्रो या पीकविमा कंपनीच्या कार्यालयात तोडफोड केली. संतप्त शिवसैनिकांनी घोषणाबाजी करीत कार्यालयातील साहित्याची तोडफोड केली.

पावसाचा खंड पडल्याने खरीप हंगामातील उत्पादनात ७५ टक्क्यांपेक्षा जास्त घट झाली. या नुकसानीचं सर्वेक्षण करून कापसाला तत्काळ विमालाभ देण्यात यावा, २०२२-२३ मध्ये केळी व संत्र्याच्या पिकांचं मोठं नुकसान झालं. त्यामुळं नियमानुसार व्याजासह शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा करावी.
गोपाल दातकर, शिवसेना जिल्हाप्रमुख, अकोला

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Artificial Intelligence: ‘एआय’ उडविणार झोप ...

India UK Trade Deal: व्यापार कराराचे फलित

Waste Management: कचऱ्याच्या ढिगाखाली गाडलेली व्यवस्था

Paddy Nursery Update: भाताच्या ५८६१ हेक्टरवर रोपवाटिका

Free Seed Distribution: दुबार पेरणीसाठी मोफत बियाणे : महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

SCROLL FOR NEXT