AI Technology Farm agrowon
ॲग्रो विशेष

AI Technology Farm : शेतातच समजणार पिकांवरील रोगाचा प्रादुर्भाव; शिवाजी विद्यापिठात एआय तंत्रज्ञानाद्वारे संशोधन

Shivaji University : शेतकऱ्यांना शेतामध्येच पिकांवर कोणत्या प्रकारच्या रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे, हे ओळखता येईल. त्यानुसार त्वरित उपाययोजना करता येतील.

sandeep Shirguppe

Shivaji University AI Technology : पिकांवरील रोगाचा प्रादुर्भाव आता शेतातच समजणार आहे. त्यासाठी संशोधनातून एआय तंत्रज्ञानाच्या आधारित एअर सॅम्पलर हे उपकरण शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील संशोधकांनी केले आहे. एअर सॅम्पलरचे संशोधन नावीन्यपूर्ण आणि शेतकऱ्यांना उपयुक्त असून, या संशोधनाचे डिझाईन पेटंट संशोधकांना मिळाले आहे. पुढील काळात त्यावर उपयुक्तता पेटंटही मिळविण्याचा मानस आहे. अशी माहिती विद्यापिठाचे सहायक ग्रंथपाल डॉ. शिवराज थोरात यांनी माहिती दिली.

"विविध पिकांवर सापडणारे आणि हवेतून संक्रमण करू शकणारे वेगवेगळ्या रोगांचे विषाणू शोधण्यासाठी आणि ओळखण्यासाठी टिळक एअर सॅम्पलर वापरला जातो. हे सॅम्पलर शेतात ठेवून सॅम्पल गोळा केले जातात. त्यानंतर प्रयोगशाळेमध्ये आणून तज्ज्ञांच्या मदतीने ओळखले जातात. अशी आजपर्यंतची प्रक्रिया आहे". असे डॉ. थोरात म्हणाले.

"तसेच या नवीन संशोधनानुसार टिळक सॅम्पलरमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. शेतकऱ्यांना शेतामध्येच पिकांवर कोणत्या प्रकारच्या रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे, हे ओळखता येईल. त्यानुसार त्वरित उपाययोजना करता येतील." असे डॉ. थोरात यांनी सांगितले.

या संशोधनात शिवाजी विद्यापीठाशी संलग्नित फलटण एज्युकेशन सोसायटीच्या श्रीमंत भैयासाहेब राजेमाने महाविद्यालय, म्हसवड येथील डॉ. सुजित जाधव, कृष्णा महाविद्यालय, रेठरे येथील डॉ. सुनीता जाधव, विद्यापीठाच्या बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्रोत केंद्राचे सहायक ग्रंथपाल डॉ. शिवराज थोरात, लंडनच्या क्विन्स मेरी युनिव्हर्सिटीत एम.एस. (ए.आय.) चे शिक्षण घेत असलेले ऋतुराज जाधव आणि राजारामबापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, इस्लामपूर येथे बी.ई. (इलेक्ट्रिकल) चे शिक्षण घेत असलेले पृथ्वीराज जाधव यांनी या संदर्भातील संशोधन केले आहे.

त्यांच्या ‘ए.आय. बेस्ड डिव्हाईस फॉर डिटेक्शन ऑफ प्लांट डिसिजेस’ या संशोधनाला भारत सरकारच्या पेटंट कार्यालयाकडून जाहीर झाले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Harbhara Tur Kharedi: हरभरा-तूर खरेदीला मुदतवाढ; मेअखेरपर्यंत दिलासा

Jintur Water Shortage: जिंतूर तालुक्यातील ३ गावांना ५ टँकरद्वारे पाणीपुरवठा

Yeola Acid Attack Case: ‘पोलिस मित्र’च निघाला शेतकऱ्यावरील अ‍ॅसिड हल्ल्याचा सूत्रधार

Parbhani Crop Insurance: परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण विमा परतावा द्या: कृषिमंत्री भरणे

Sustainable Farming: शेतकऱ्यांनी शाश्वत शेती पद्धतींचा अवलंब करावा

SCROLL FOR NEXT