Paddy Crop Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage Survey : विक्रमगडमध्ये नुकसानीचे पंचनामे वेगात

Paddy Crop Damage : विक्रमगड तालुक्यात १२ ते १९ ऑक्टोबरदरम्यान रोज संध्याकाळी अचानक विजेच्या गडगडाटासह परतीच्या पावसाच्या जोरदार सरी बरसू लागल्या होत्या.

Team Agrowon

Vikramgad News : तालुक्यात नवरात्रोत्सवानंतर हळवे भातपीक तयार झाल्याने कापणीला जोर पकडला होता; मात्र गेल्या एका आठवड्यापासून संध्याकाळच्या सुमारास विजेच्या गडगडाटात जोरदार वाऱ्यासह परतीचा पाऊस जोरदार बरसू लागल्याने अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते.

नुकसान झालेल्या पिकाचे पंचनामे करण्याची मागणी केली होती. त्यानुसार तालुक्यात भातपिकाचे पंचनामे करण्याचे आदेश विक्रमगड तहसील कार्यालयाकडून देण्यात आले आहेत.

विक्रमगड तालुक्यात १२ ते १९ ऑक्टोबरदरम्यान रोज संध्याकाळी अचानक विजेच्या गडगडाटासह परतीच्या पावसाच्या जोरदार सरी बरसू लागल्या होत्या. याचा परिणाम तयार झालेल्या कापणी केलेल्या भातपिकावर झाला असून मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

यामध्ये स्थानिक प्रशासनाकडून नुकसान झालेल्या भातपिकाचे पंचनाम्याच्या कामास सुरुवात झाली आहे. ग्रामपातळीवर ग्रामपंचायत अधिकारी (ग्रामसेवक), कृषी अधिकारी, तसेच तलाठी यांच्यामार्फत पंचनामा सुरू करण्यात आले आहेत. तालुकास्तरावर तहसीलदार, गटविकास अधिकारी, तसेच तालुका कृषी अधिकारी यांच्यामार्फत पंचनाम्याचा अहवाल येत्या काही दिवसांत सरकारकडे सादर होणार आहेत.

आवश्यक कागदपत्रे

आधार कार्ड

बँक पासबुक

सात-बारा

नुकसानीचा फोटो

शेतकरी मयत असल्यास

त्याच्या वारसाची कागदपत्रे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Union Budget: अन्नदाता शेतकरी पुन्हा एकदा वाऱ्यावर...!

Chief Secretary Review: नोंदणी, मुद्रांक विभागाचा मुख्य सचिवांकडून आढावा

Ajit Pawar Condolence Meeting: दादांच्या योगदानाबाबत बारामतीत कृतज्ञता व्यक्त

Natural Farming: नैसर्गिक शेतीसाठी साधन निर्मिती गरजेची: डॉ. नारनवरे

Union Budget Agri: शेतकऱ्यांना ‘नारळ’

SCROLL FOR NEXT