Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage : पुसद तालुक्यात ३० हजार हेक्टर क्षेत्र पावसामुळे बाधित

Post Mansoon Rain : पुसद तालुक्यात २७ व २८ रोजी झालेल्या मॉन्सूनोत्तर पावसामुळे सुमारे ३० हजार हेक्टर क्षेत्रावरील कापूस, तूर, हरभरा, गहू व केळी पिकांचे नुकसान झाले.

Team Agrowon

Yavatmal News : पुसद तालुक्यात २७ व २८ रोजी झालेल्या मॉन्सूनोत्तर पावसामुळे सुमारे ३० हजार हेक्टर क्षेत्रावरील कापूस, तूर, हरभरा, गहू व केळी पिकांचे नुकसान झाले. तहसीलदार व कृषी विभागाने नजर अंदाज नुकसानीचा अहवाल जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर केला आहे.

पुसद तालुक्यात दोन दिवस झालेल्या जोरदार अवकाळी पावसामुळे उभ्या पिकांना मोठा फटका बसला आहे. वीज पडून चिखली येथे एक बैल ठार झाला, तर शेंबाळपिंपरी येथे पाच मेंढ्या वीज कोसळल्याने ठार झाल्या. तालुक्यातील १८९ गावे अवकाळी पावसाने बाधित झाले.

एकूण १९ हजार ५९६ हेक्टर क्षेत्रावरील कापूस पिकांचे नुकसान झाले. त्या खालोखाल तूर पिकाला फटका बसला. एकूण चार हजार ५७१ हेक्टर क्षेत्रातील तूर पीक पावसाच्या तडाख्यामुळे जमिनीवर लोळले. एकूण तीन हजार ७०६ हेक्टर क्षेत्रातील हरभरा पिकाचे नुकसान झाले.

एकूण दोन हजार ३४० हेक्टर क्षेत्रावरील गहू पिकांचे नुकसान झाले आहे. तसेच पाच हेक्टर क्षेत्रातील केळी पिकाला फटका बसला आहे. सोमवारी (ता. २७) ४८.९ मिलिमीटर व मंगळवारी ५७ मिलिमीटर पाऊस झाला. दोन दिवसांत एकूण १०५.९ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली.

आमदारद्वयांनी घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट

पुसद विधानसभेचे आमदार इंद्रनील नाईक व विधानपरिषद सदस्य नीलय नाईक यांनी तातडीने जिल्हाधिकारी डॉ. आशिया व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मैनाक घोष यांची भेट घेऊन शेती पिकांचे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात यावे, अशी मागणी केली. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने पावले उचलण्याचे आश्वासन दिले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Monsoon Rain: मराठवाड्यात पावसाचा जोर कमीच; पूर्व विदर्भ आणि कोकणात पुढील ४ दिवस जोरदार पावसाचा अंदाज

Agrowon Podcast: गव्हाचे भाव स्थिरावले; डाळिंब तेजीत, मुग दबावात, केळीच्या दरात वाढ, उडदाचे भाव स्थिर

ZP School Admission : बोराखेडी जिल्हा परिषद शाळेत प्रवेश ‘ॲडमिशन फुल्ल’

Tree Plantation : जैवविविधता जपण्यासाठी वृक्षारोपण गरजेचे

Farmers Welfare: बच्चू कडू यांच्या मागण्यांना सरकारचा सकारात्मक प्रतिसाद; शेतकरी,मजुरांसाठी आश्वासने

SCROLL FOR NEXT