Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Unseasonal Rain : बुलडाणा जिल्ह्यात पिकांचे नुकसान थांबता थांबेना

Crop Damage : साखरखेर्डा भागात बुधवारी (ता. २४) वादळी पावसाने तडाखा दिला. मेरा बुद्रुक परिसरात मोठी गारपीटही झाली.

 गोपाल हागे

Buldana News : साखरखेर्डा भागात बुधवारी (ता. २४) वादळी पावसाने तडाखा दिला. मेरा बुद्रुक परिसरात मोठी गारपीटही झाली. यामुळे शाळू ज्वारी, बाजरी व कांदा बीजोत्पादन प्लॉटचे मोठे नुकसान झाले.

झाडे कोलमडून पडली. अनेकांच्या घरांवरील टीनपत्र्ये उडून गेले. त्यात गुरुवारी (ता. २५) रात्री पुन्हा बुलडाणा जिल्ह्यात पुन्हा पावसाने धुमाकूळ घातला. यामुळे पीक नुकसानीचे क्षेत्र आणखी वाढण्याचा अंदाज आहे.

गारपिटीमुळे परिपक्व कांदा बियाणे प्लॉटमध्ये गोंडे मोडून जमिनीवर पडले. ज्वारी पीक जमिनीवर आले. कांदा बियाण्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घटण्याची शक्यता आहे. संभाव्य आर्थिक नुकसान लक्षात घेता सरकारने नुकसानग्रस्त कांदा बीजोत्पादन शेतीचे पंचनामे करून मदत देण्याची मागणी शेतकरी करीत आहेत.

चिखली तालुक्यातील मेरा बुद्रुक येथे एक शेतकरी महिला अन्नपूर्णा कोंडूबा शेळके (वय ६५) म्हशींना चारापाणी करण्यासाठी शेतात गेल्या होत्या. त्या वेळी वीज पडून त्या गंभीर जखमी झाल्या.

साडेतीन हजार हेक्टरचे नुकसान

बुलडाणा जिल्ह्यात मंगळवारी (ता. २३) आणि बुधवारी (ता. २४) झालेल्या वादळी पाऊस व गारपिटीमुळे पुन्हा एकदा नुकसान झाले. या वेळी साडेतीन हजार हेक्टरपर्यंत पिकांना फटका बसला आहे.

विविध तालुक्यांतील ५९ गावांमध्ये हा तडाखा बसला. सततच्या अवकाळीने नुकसानीचे प्रमाण वाढतच आहे. चिखलीत ४२७, खामगावात २८८२, शेगावमध्ये ३०, तर देऊळगावराजा तालुक्यात ९० हेक्टरचे नुकसान झाले. खामगाव तालुक्यात सातत्याने नैसर्गिक आपत्तींचा जोर आहे.

६० गुंठ्यांवर कांदा बीजोत्पादन प्लॉटची लागवड केली. येत्या महिन्यात उत्पादन हाती येऊन किमान २.५० लाख रुपयांचे आर्थिक उत्पन्नाची अपेक्षा होती. मात्र पावसाने प्लॉटचे नुकसान झाले. शासनाने मदत द्यावी.
- भिकाजी पाटील, शेतकरी, रा. गोरेगाव, ता. सिंदखेडराजा

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Garlic Rate : लसणाची आवक घटल्याने दर तेजीतच

Forest Fire : वणवे नियंत्रणासाठी जनजागृती करण्याची गरज

Sugarcane Labor Migration : निवडणूक संपताच ऊसतोड मजुरांचे स्थलांतर

Sugarcane FRP : मंडलिक साखर कारखाना इतरांच्या बरोबरीने दर देणार

Milk Rate : देशातील दूध उत्पादनात ४ टक्के वाढ; केंद्रीय मंत्र्यांची माहिती

SCROLL FOR NEXT