Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Unseasonal Rain : केळी बागा जमीनदोस्त; बेदाण्याचा चिखल

Crop Damage : गेल्या काही दिवसांपासून पंढरपूर तालुक्यात अवकाळी पावसाने हाहाकार माजविला आहे.

Team Agrowon

Solapur News : गेल्या काही दिवसांपासून पंढरपूर तालुक्यात अवकाळी पावसाने हाहाकार माजविला आहे. दररोज भाग बदलून पडणाऱ्या या पावसाने पांढरेवाडी व जाधववाडी येथील द्राक्ष व केळी उत्पादकांचे प्रचंड नुकसान केले आहे.

पंढरपूर तालुक्यातील पोढरेवाडी व जाधववाडी या भागात बुधवारी (ता. १७ ) वादळासह जोरदार पाऊस पडला. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या केळीच्या बागा जमीनदोस्त झाल्या, तर काही शेतकऱ्यांचा शेडवर टाकलेला बेदाणा भिजून त्याचा पार चिखल झाला.

शेडवरील प्लॅस्टिक कागद फाटल्यामुळे बेदाणा भिजला. त्यामुळे तो काळा पडला. बुरशी पकडल्यामुळे बेदाण्याची नासाडी झाली, तर दुसरीकडे उभ्या केळीच्या बागा जमीनदोस्त झाल्या.

नुकसानग्रस्त बागांचे पंचनामे पूर्ण झाले नसल्यामुळे नेमके किती नुकसान झाले, याची माहिती समजू शकली नाही.

बुधवारच्या वादळी पावसामुळे चार एकर केळीची बाग पडून लाखोंचे नुकसान झाले.
- नंदकुमार फाळके, केळी उत्पादक, पांढरेवाडी, ता. पंढरपूर.
पावसासह जोराच्या वाऱ्यामुळे बेदाणा शेडवरील प्लॅस्टिक कागद फाटला. त्यामुळे बेदाणा पूर्ण भिजून त्याचा चिखल झाला.
- सुरेंद्र कोरडे, द्राक्ष उत्पादक, जाधववाडी, जि. पंढरपूर.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Relief: नाशिकसह तीन जिल्ह्यांतील १ लाख ४५ हजार शेतकऱ्यांना दिलासा, ८६ कोटी ६५ लाख मदत मंजूर

Agri University Research : कृषी विद्यापीठाची संशोधनात ओळख अधिक बळकट होईल

Ring Road Project : रिंग रोड बाधितांचा शासनाविरोधात एल्गार

Murrah Buffalo Subsidy: मुऱ्हा म्हैस खरेदीसाठी ‘चितळे’ देणार अनुदान

Kisan Credit Card : किसान क्रेडिट कार्ड, पशू किसान क्रेडिट कार्डातील अडचणी सोडवा

SCROLL FOR NEXT