Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage : सोलापुरात १३६६ हेक्टर पिके, फळबागांची दाणादाण

Unseasonal Rain : गेल्या आठवड्यात जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसाने शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

सुदर्शन सुतार

Solapur News : गेल्या आठवड्यात जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसाने शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. प्रामुख्याने केळी, डाळिंब, आंबा, कलिंगड, खरबूज या फळपिकांना त्याचा फटका बसला आहे. कृषी विभागाने काढलेल्या नुकसानीच्या नजर अंदाजानुसार आतापर्यंत जिल्ह्यातील १ हजार ३६६ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे.

आधीच उन्हाच्या तडाख्याने लोकांची होरपळ सुरू असताना, त्यात अवकाळीने मोठा तडाखा दिला. विशेषतः पिकांचे आणि काही भागात घरांचेही नुकसान झाले. वादळी पाऊस झाल्याने नुकसानीत मोठी भर पडली.

कृषी विभागाच्या अहवालानुसार, या पावसाचा सर्वाधिक तडाखा पंढरपूर तालुक्याला बसला आहे. या तालुक्यातील १ हजार १५६ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.

त्या खालोखाल माढा तालुक्यातील ११९.९०, मोहोळमधील ४ हेक्टर, करमाळ्यातील २० हेक्टर, माळशिरसमधील ३८.३० हेक्टर आणि मंगळवेढा तालुक्यातील २८ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.

तर सांगोला, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट आणि बार्शी या तालुक्यातही नुकसान झाले आहे, पण त्याची आकडेवारी अद्याप अंतिम झालेली नाही, असे सांगण्यात आले.

आम्ही नुकसानीचा नजर अंदाज घेतो आहोत. त्यानुसार हे आकडे आले आहेत. अद्याप काही काम बाकी आहे. येत्या दोन दिवसांत नुकसानीचे नेमके आकडे समोर येतील.
- दत्तात्रेय गावसाने, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सोलापूर.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

New Gram Panchayat Schemes: ग्रामपंचायतींसाठी पाच नव्या योजनांना मंजुरी

Cibil Score Issue: कर्जमुक्ती योजनेमुळे सिबिल स्कोअरवर परिणाम : तुपकर

Farmer Protest Warning: ‘डीबीटी’साठी शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

Mechanical Paddy Transplanting: चिखलगावात यांत्रिक पद्धतीने भात लागवड

Onion Tomato Report: कांदा, टोमॅटोचा अहवाल १५ ऑगस्टपर्यंत सादर करा: पाशा पटेल समितीला निर्देश

SCROLL FOR NEXT