Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage : मॉन्सूनोत्तर पावसामुळे पिकांचे नुकसान

Post Monsoon Rain : परतीचा पाऊस गेल्यानंतर मॉन्सूनोत्तर पावसाचा अधूनमधून दणका सुरू आहे. अनेक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळत आहे.

Team Agrowon

Pune News : परतीचा पाऊस गेल्यानंतर मॉन्सूनोत्तर पावसाचा अधूनमधून दणका सुरू आहे. अनेक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळत आहे. मंगळवारी (ता. २२) सकाळी आठ वाजेपर्यंत आंबेगावमधील मंचर येथे ३६ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली. या पावसामुळे पिकांचे नुकसान होत असल्याने रब्बीच्या तोंडावर शेतकरी अडचणीत आले आहे.

जिल्ह्यात अनेक ठिकाणी मॉन्सूनोत्तर पाऊस कोसळत आहे. तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस होत आहे. परंतु या पावसामुळे काढणीच्या अवस्थेत असलेल्या बाजरी, सोयाबीन, कापूस पिकांचे नुकसान होत आहे.

त्यातच दिवाळी सणामुळे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी झेंडूचे पिके घेतली आहे. या पावसामुळे झेंडूच्या फुलांमध्ये पाणी शिरून जड झाल्याने फुले खाली पडून नुकसान होत आहे. त्यातच कापसाचे बोंडे ऊन पडल्यामुळे फुटू लागली आहे. परंतु पाऊस पडत असल्याने बोंडामध्ये पाणी शिरल्याने कापूस भिजत आहे.

जुन्नर तालुक्यात कृषी विभागाच्या पाहणीनुसार परतीच्या पावसाने २८६ शेतकऱ्यांचे सुमारे ८६ हेक्टर क्षेत्रामधील भात पिकाचे नुकसान झाल्याचे आढळून आले आहे, अशी तालुका कृषी अधिकारी गणेश भोसले यांनी सांगितले.

तालुक्यात घाटघर-नाणेघाट, हिवरे पठार तसेच मढ, कोपरे-मांडवे परिसरात झालेल्या वादळी पावसाने भात पीक शेतात आडवे झाले आहे. काही भागात निसवण्याच्या अवस्थेत तर काही ठिकाणी कापणीस आलेल्या भातास परतीच्या पावसाचा फटका बसला आहे.जिल्ह्यात सोमवारी सकाळपासून काही अंशी ढगाळ वातावरण होते. परंतु दुपारनंतर वातावरणात बदल होत असून, अचानक ढग भरून येत असून जोरदार पाऊस पडत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Harbhara Tur Kharedi: हरभरा-तूर खरेदीला मुदतवाढ; मेअखेरपर्यंत दिलासा

Jintur Water Shortage: जिंतूर तालुक्यातील ३ गावांना ५ टँकरद्वारे पाणीपुरवठा

Yeola Acid Attack Case: ‘पोलिस मित्र’च निघाला शेतकऱ्यावरील अ‍ॅसिड हल्ल्याचा सूत्रधार

Parbhani Crop Insurance: परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण विमा परतावा द्या: कृषिमंत्री भरणे

Sustainable Farming: शेतकऱ्यांनी शाश्वत शेती पद्धतींचा अवलंब करावा

SCROLL FOR NEXT