Bribe Agrowon
ॲग्रो विशेष

Bribery Case : लाचप्रकरणी खासगी महिला टंकलेखकावर गुन्हा

Anti-Corruption Division : खेड भूमी अभिलेख कार्यालयातील खासगी टंकलेखक महिलेवर नऊ हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Team Agrowon

Pune News : खेड भूमी अभिलेख कार्यालयातील खासगी टंकलेखक महिलेवर नऊ हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांच्या पतीचे खेड तालुक्यातील साबर्डी येथे गट नं. २४५ मध्ये एकूण ६३ गुंठे शेत जमीन असून, या गटाची मोजणी करण्याकरिता तक्रारदार यांच्या पतीने एक जानेवारी २०२४ रोजी उपअधीक्षक भूमी अभिलेख, नगर भूमापक अधिकारी, ता. खेड (जि. पुणे) यांच्याकडे अर्ज दिला होता.

खासगी टायपिस्ट महिला सुनंदा वाजे या सध्या नगर भूमापन अधिकारी खेड कार्यालयामध्ये खासगी टायपिस्ट म्हणून काम करतात. खासगी टायपिस्ट महिला सुनंदा वाजे यांनी तक्रारदारांकडे हे काम करण्यासाठी प्रथम १२ हजार रुपये व त्यानंतर ऑनलाइन फॉर्म करण्याकरिता आणखी दोन हजार रुपये लागतील, असे सांगितल्यावर तक्रारदार यांनी सदर रक्कम रोख स्वरूपात दिली.

तक्रारदार यांच्या पतीच्या नावावर असलेल्या जमिनीची मोजणी करण्यात आली. त्यानंतर सुनंदा वाजे यांनी तक्रारदार यांना फोन करून, लोकसेवकाने जमीन मोजणीसाठी आणलेल्या मशिनचे आणखी सहा हजार रुपये व जमिनीचे कागदपत्र तयार करण्याकरिता तीन हजार रुपये असे एकूण नऊ हजार रुपयांची मागणी केली.

या संबंधीची तक्रार तक्रारदार यांनी दिली होती. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर वाजे यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याविरुद्ध खेड पोलिस स्टेशन, पुणे ग्रामीण येथे वरीलप्रमाणे गुन्हा नोंद केला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: सोयाबीनमध्ये चढ उतार ; टोमॅटो दर टिकून, केळीला मागणी, आल्याला उठाव तर गवारची आवक टिकून

Sugarcane FRP Dues: थकीत 'एफआरपी'प्रश्नी ८१ साखर कारखान्यांना नोटिसा, सहकारमंत्री बाबासाहेब पाटलांची विधानपरिषदेत माहिती

Cotton Productivity Mission: कापूस उत्पादकता अभियान फसण्याचे संकेत

Rain Update In Maharashtra: कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील ६ जिल्ह्यांत जोरदार पावसाचा अंदाज 

Crop Insurance: पीकविमा योजनेत शेतकऱ्यांना वेळेत नुकसान भरपाई मिळेना; कृषिमंत्र्यांची कबुली

SCROLL FOR NEXT