Kesar Mango Agrowon
ॲग्रो विशेष

Kesar Mango : अति घन केसर आंबा लागवडीतून आर्थिक क्रांती करा

Mango Cultivation : अहिल्यानगर जिल्ह्यातील एका शेतकऱ्यांने १२० एकर क्षेत्रातून पावणेनऊ कोटीचे उत्पन्न गेल्या वर्षी कसे मिळवले तसेच इतरही शेतकऱ्यांनी एकरी ७ ते ९ लाख रुपये गेल्या आठ-दहा वर्षांपासून मिळवितात, याविषयी सविस्तर माहिती दिली.

Team Agrowon

Jalna News : शेतकऱ्यांनी गट पद्धतीने आधुनिक अशा अति घन पद्धतीने आंबा लागवड करावी व त्यामधून आर्थिक क्रांती करावी, असा सल्ला गट शेती प्रणेते तथा आंबा तज्ज्ञ डॉ. भगवानराव कापसे यांनी दिला.

खानापूर (ता. जाफराबाद, जि. जालना) येथे ॲग्रो इंडिया गट शेती संघाचा शेतकरी मेळाव्यात डॉ.कापसे मार्गदर्शन करीत होते. अहिल्यानगर जिल्ह्यातील एका शेतकऱ्यांने १२० एकर क्षेत्रातून पावणेनऊ कोटीचे उत्पन्न गेल्या वर्षी कसे मिळवले तसेच इतरही शेतकऱ्यांनी एकरी ७ ते ९ लाख रुपये गेल्या आठ-दहा वर्षांपासून मिळवितात, याविषयी सविस्तर माहिती दिली.

मध्यम ते हलक्या जमिनी आंबा लागवडीसाठी अतिशय योग्य आहेत. अशा जमिनीत १४ बाय ५ फुटावर केसर आंबा लागवड करावी. लागवड करताना कलमाच्या बाजूला तीन कोयी लावून त्या कोयी उगवून थोड्या मोठ्या झाल्या की त्यांचे शेंडे मारून पाचर करावी व कलमाच्या खोडात बसून द्यावी.

म्हणजे एक कलमाचे खोड आणि एक वहीवर उगवलेल्या रोपांचे खोड याचा जोड होईल. यामुळे कोयीपासून बनलेल्या रोपाचे सोटमुळ पार खाली जाईल. यालाच कलम लागवड आणि इनसितू लागवड या दोन्हीचा हायब्रीड मोड म्हणतात.

अशा बागेत तिसऱ्याच वर्षी अडीच ते तीन टन उत्पादन सहज घेता येते. यावर्षी टेंभुर्णी भागातील आंबा नक्कीच अमेरिका किंवा जपानला निर्यात करण्याचे आश्वासनही कापसे यांनी दिले.

यावेळी प्राचार्य डॉ. बैनाडे यांनी अति घन लागवड कापूस याबद्दल तसेच सोयाबीन, तूर लागवडी बाबतचे सविस्तर तंत्रज्ञान विशद केले. डॉ. एस एस. माने यांनी कापसाचे विविध वाण व अति घन लागवडीबाबत माहिती दिली.

प्रा. मुजफ्फर यांनी गहू लागवड व उत्पन्न वाढीचे तंत्र सांगितले. टेंभुर्णीचे श्री खोत महाराज यांनी आंबा उत्पादन अनुभव याबद्दल माहिती दिली. लक्ष्मण सवडे गट शेती प्रमुख यांनी गटशेतीच्या आतापर्यंतच्या वाटचालीबद्दल सविस्तर माहिती दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT