Bogus Seed  Agrowon
ॲग्रो विशेष

Bogus Seed : बोगस बियाणे, खतांचा पुरवठा न होण्याबाबत दक्षता घ्या

Kharif Season 2025 : या हंगामात बोगस बियाणे व खतांचा पुरवठा होणार नाही याची दक्षता घ्यावी व त्यासाठी तपासणीसाठी भरारी पथाकांची स्थापना करावी, असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.

Team Agrowon

Satara News : हवामान विभागाने यंदा १०३ टक्के पाऊस होण्याचा अंदाज वर्तविला आहे. यामुळे खरिपातील पेरणीचे क्षेत्र वाढणार आहे. या हंगामात बोगस बियाणे व खतांचा पुरवठा होणार नाही याची दक्षता घ्यावी व त्यासाठी तपासणीसाठी भरारी पथाकांची स्थापना करावी, असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले. 

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात खरीप हंगाम पूर्व नियोजन बैठक पालकमंत्री श्री. देसाई यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीला ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे (दूरदृष्य प्रणाली), जिल्हाधिकारी संतोष पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास सिद, विभागीय कृषी सहसंचालक अजय कुलकर्णी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे, आत्माचे प्रकल्प संचालक अजय शेंडे यांच्यासह कृषी विभागातील अधिकारी उपस्थित होते.

खंरीप हंगामामध्ये बियाणे व खतांचा तुटवडा भासणार नाही याची कृषी विभागाने दक्षता घ्यावी, असे सांगून पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, की कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून हेक्टरी उसाचे उत्पादन वाढविण्यासाठी कृषी विभागाने प्रयत्न करावेत. या तंत्रज्ञानाची शेतकऱ्यांना माहिती द्यावी.

जिल्ह्यात फळबाग लागवड वाढावी यासाठी कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ द्यावा. दुष्काळी तालुक्यात डाळिंब व पाटण तालुक्यात आंबा पिकांच्या रोपांचे वाटप करावे. सेंद्रिय शेती आता काळाची गरज बनली आहे. सेंद्रिय शेती करण्याबाबत शेतकऱ्यांना आवाहन करावे. प्रारंभी फरांदे यांनी खंरीप हंगाममध्ये करण्यात आलेल्या नियोजनाची माहिती दिली.

आयएसओ कार्यालयांचा सन्मान

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सातारा यांच्या अधिनस्त असणारी उपविभागीय कृषी अधिकारी, सातारा, कराड व वाई तसेच तालुका कृषी अधिकारी, सातारा, खटाव, कराड, पाटण, वाई व जावळी ही कार्यालये आयएसओ मानांकित ठरली आहेत. या कार्यालयांचा पालकमंत्री श्री. देसाई यांच्या हस्ते आयएसओ मानांकन प्रमाणपत्रे देऊन सन्मान करण्यात आला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mumbai APMC: मुंबई बाजार समितीच्या कारभाराची होणार चौकशी

Israel Lebanon Conflict: लेबनॉनमध्ये युद्धविराम नाही

White Grub Pest Management: हुमणी किडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मार्गदर्शन मोहीम

Central Government Policy: कांदा, साखर उद्योगांबाबत बुधवारपर्यंत केंद्र निर्णय घेईल : आमदार दिलीप वळसे पाटील

Soybean Oil Demand: अमेरिकेत जैवइंधनासाठी सोयातेलाचा वापर वाढता

SCROLL FOR NEXT