Sand Extraction Agrowon
ॲग्रो विशेष

Sand Excavation : गिरणा नदीत बेसुमार वाळूउपसा सुरूच

Sand Mafia : जळगाव जिल्ह्यात पश्‍चिम भागासाठी वरदान असलेल्या गिरणा नदीतून अनेक भागांत बेसुमार वाळू अनेक वर्षे उपसा सुरू आहे.

Team Agrowon

Jalgaon News : जळगाव जिल्ह्यात पश्‍चिम भागासाठी वरदान असलेल्या गिरणा नदीतून अनेक भागांत बेसुमार वाळू अनेक वर्षे उपसा सुरू आहे. प्रशासन फक्त कारवाईचा देखावा करते. पुढे ही समस्या पुन्हा ‘जैसे थे’ असते.

नदीकाठीदेखील टंचाई तयार होत आहे. बेसुमार वाळूउपशाने नदीकाठच्या विहिरी, कूपनलिकांचे पुनर्भरण होत नसल्याने जलसाठे कमी होत असल्याची स्थिती असून, ही समस्या दूर करण्यासाठी गिरणा नदीतून दर महिन्याला पाण्याचे आवर्तन सोडले जावे, अशी मागणी केली जात आहे.

गिरणा नदी चाळीसगाव, पाचोरा, भडगाव, एरंडोल, धरणगाव, जळगाव या तालुक्यांसाठी महत्त्वाची आहे. या नदीत जळगाव, धरणगाव, भडगाव, पाचोरा, चाळीसगाव भागांत वाळूची चोरी केली जाते. रात्रंदिवस वाळूउपसा सुरू असतो. जळगाव तालुक्यात आव्हाणे, खेडी खुर्द लगतच्या भागातून तर गेले २५ वर्षे वाळू उपसा सुरू आहे. याचा फटका आता शेतकऱ्यांना बसत आहे.

तसेच गावांच्या सार्वजनिक पाणीपुरवठा विहिरी, कूपनलिका आटत आहेत. कारण नदीत वाळू नसल्याने पाणी वाहून जाते. पाण्याचे पुनर्भरण होत नाही. शिवार उजाड होत आहे. कारण कूपनलिका, विहिरी शेतात आटत आहेत. केळी, लिंबू, भाजीपाला, रब्बी पिकांची शेती नष्ट होत आहे. याकडे प्रशासन लक्ष देत नाही.

गावांमध्ये वाळूचे ढीग तयार केले जातात. वाळूउपसा करणारी वाहने सुसाट वेगात असतात. यात अनेक अपघात होतात. रस्त्यांची दैनावस्था होते. या प्रकाराला स्थानिक ग्रामपंचायती, लोकप्रतिनिधींचे बळ आहे. वाळू चोरी प्रशासनाला कशी माहिती नाही, असा प्रश्‍न शेतकरी उपस्थित करीत आहेत. याकडे गांभीर्याने लक्ष देवून कार्यवाही करणे गरजेचे आहे.

अन्यथा गिरणा काठ उजाड होईल. शिवार कोरडे होईल, सध्या उष्णता वाढत आहे. यामुळे गावोगावी पाण्याचा वापर वाढला आहे. अनेक गावांमध्ये एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जातो. परंतु टंचाई वाढल्यास पाणीपुरवठा आणखी अधिक विलंबाने करावा लागेल. यामुळे नदीत पाणी सोडण्याची मागणी शेतकरी, ग्रामस्थ करीत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

CM Samruddha Panchayat Raj: मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाची पडताळणी सुरू

NAFED Kharedi: नाफेडच्या खरेदी बंदमुळे हरभरा उत्पादक अडचणीत

Crop Insurance: पीकविमा भरपाईसाठी ‘हाहाकार मोर्चा’

Fake Seeds: बियाणे, खते, कीटकनाशकांचे ११८ नमुने अप्रमाणित

Farm Machinery Subsidy: शेतकऱ्यांना ट्रॅक्टर, अवजारे खरेदीसाठी अनुदान, कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी २० कोटींच्या निधीस मंजुरी

SCROLL FOR NEXT