Silk Farming Agrowon
ॲग्रो विशेष

Silk Farming : रेशीम उद्योगविषयक परिषदेचे फेब्रुवारीत आयोजन

Silk industry : सोलापूर विद्यापीठ आणि सिंहगड महाविद्यालयाचा पुढाकार

Team Agrowon

अॅग्रोवन वृत्तसेवा
Solapur News : सोलापूर ः पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील भूशास्त्र संकुल आणि केगाव येथील एन. बी. नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सेंटर फॉर रिसर्च अॅण्ड टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने १६ ते १९ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत रेशीम उत्पादन व अत्याधुनिक तंत्रज्ञान या विषयाशी निगडीत ‘ए मल्टी मेगा इव्हेंट ऑन इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजीज फॉर विकसित भारत’चे आयोजन करण्यात आल्याची माहिती विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

डॉ. महानवर म्हणाले, या आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांमुळे सिल्क सायन्स व टेक्नॉलॉजीला नवा आयाम मिळणार असून नवसंशोधकांसाठी, शेतकऱ्यांसाठी, विद्यार्थ्यांसाठी, नवउद्योजकांसाठी हा कार्यक्रम पर्वणी ठरणार आहे.

याअंतर्गत सिल्क फाईब्रॉईन याविषयावर आधारित आंतरराष्ट्रीय परिषद, विद्यार्थ्यांसाठी प्रश्नमंजूषा, सिल्क सायन्स या विषयावर प्रदर्शन ‘डिस्टा २०२४’ या तांत्रिक स्पर्धेचे आयोजन या निमित्ताने केले जाणार आहे.

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी विविध समित्या बनविण्यात आल्या आहेत. या आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी विविध देश, राज्यांतून संशोधक व उद्योजक उपस्थित राहणार आहेत.

यासाठी आर्थिक साहाय्य विविध शासकीय निमशासकीय विभाग तसेच सामाजिक संस्था उद्योग समूह यांच्यामार्फत होणार आहे. या आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी उद्योजकांनी व सामाजिक स्वयंसेवी संस्थांनी सहकार्य करावे, असेही ते म्हणाले.


...म्हणून ही परिषद महत्त्वाची
‘सीआरटीडी’चे संचालक व डी. वाय. पाटील विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. शिवाजी पवार यांनी सांगितले की, रेशीम कोळी व रेशीम किडे यापासून मिळणारे रेशीम म्हणजेच सिल्क हे पदार्थविज्ञान संशोधनासाठी महत्त्वाचा घटक असल्याचे संशोधनातून सिद्ध झाले आहे,

सिल्क हे प्रोटिन्सने समृद्ध असल्यामुळे व त्याच्या असलेल्या विशिष्ट जैवगुणधर्मामुळे ते इतर पॉलिमर्सपेक्षा सरस ठरते, त्यादृष्टीने ही परिषद महत्त्वाची आहे, असेही ते म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Family Compensation: आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना तातडीने मदत; २५ कोटी मंजूर

Fake Fertilizer Sale: भोकरमध्ये बनावट खत विक्रीचा पर्दाफाश

Heavy Rainfall Impact: वादळाचा वीज महावितरणला झटका

Fertilizer Supply Issue: मंजूर साठ्यापेक्षा ४ हजार ४२८ टन कमी खताचा पुरवठा

Kharif Season Preparation: खरीप हंगामासाठी गावोगावी तयारीला वेग

SCROLL FOR NEXT