Kharif Sowing Agrowon
ॲग्रो विशेष

Kahrif Sowing : मराठवाड्याच्या दोन जिल्ह्यांत २६,६३३ हेक्टरवर पेरणी

Kharif Season 2025 : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पेरणी झाली असली तरी तूर्त त्याची कृषी विभागाकडे नोंद दिसत नाही.

Team Agrowon

Chh. Sambhajinagar News : मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना व बीड या तीन जिल्ह्यांतील सरासरी २१ लाख ४२ हजार २३ हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत दोन जिल्ह्यांत २६ हजार ६३३ हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पेरणी झाली असली तरी तूर्त त्याची कृषी विभागाकडे नोंद दिसत नाही.

जालना व बीड या दोन जिल्ह्यांत झालेल्या पेरणीमध्ये सर्वाधिक १६ हजार ८११ हेक्टर क्षेत्र कपाशीचे असून त्यापाठोपाठ ५२२७ हेक्टरवरील गळीतधान्य, ४५९५ हेक्टरवरील अन्नधान्य तर १३५८ हेक्टरवर पेरणी झालेल्या तृणधान्याच्या क्षेत्राचा समावेश आहे.

यंदाच्या खरीप हंगामासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ६ लाख ८१ हजार ९०३ हेक्टर क्षेत्र प्रस्तावित करण्यात आले आहे. जालना जिल्ह्यात ६ लाख ५१ हजार १७३ हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र असून त्यापैकी ३.३४ टक्के म्हणजे २१,७४८ हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली आहे. बीड जिल्ह्यात खरिपाचे सर्व साधारण क्षेत्र आठ लाख ८ हजार ९४५ हेक्टर असून त्यापैकी ०.६० टक्के म्हणजे ४८५ हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली आहे.

कपाशी लागवड गतीने

छत्रपती संभाजीनगर, जालना व बीड या तिन्ही जिल्ह्यांत कपाशी लागवडीला शेतकऱ्यांनी सर्वाधिक पसंती दिली आहे. मे च्या पहिल्या आठवड्यापासून पूर्वमौसमी पाऊस कमीअधिक प्रमाणात होत राहिल्याने मोठ्या प्रमाणात कपाशी लागवड झाली. त्यामुळे पूर्वमोसमी पावसाने या कपाशी लागवडीला अधिक गती देण्याचेच काम केले आहे.

रान तयार करणे सुरूच

पूर्वमोसमी व मोसमी पाऊस सर्वदूर दिसत असला तरी त्याचे प्रमाण सर्वदूर सारखेच नाही. शिवाय मे महिन्यात पेरणी पूर्व मशागतीची कामे बहुतांश भागात पूर्वमोसमी पावसामुळे होऊ शकली नाही. त्यामुळे काही ठिकाणी पेरणी तर काही ठिकाणी रानाची तयारी करणे सुरू असल्याची स्थिती आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Heavy Rain In Maharashtra: राज्यात मुसळधार पावसाचा शेती पिकांना फटका; गावांमध्ये शिरले पाणी, बचावकार्य सुरु

Konkan crop advisory: कृषी सल्ला : कोकण विभाग

Election Commission: निवडणूक आयोगाचा राहुल गांधींना इशारा; तर विरोधकांचा मुख्य निवडणूक आयुक्तांवर महाभियोगाचा विचार

Heavy Rain : जोरदार पावसाने पश्चिम विदर्भात धुमाकूळ

India Security: आस समृद्धी अन् सुरक्षेची!

SCROLL FOR NEXT