Soybean Crop agrowon
ॲग्रो विशेष

Soybean Crop Subsidy : सांगलीतील ३१ हजार सोयाबीन, कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार ५ हजारांचे अनुदान

Soybean Cotton Subsidy : सांगली जिल्ह्याचे जिल्हा कृषी अधीक्षक विवेक कुंभार म्हणाले की, एक हेक्टर कापूस आणि सोयाबीन पिकाला प्रत्येकी पाच हजार असे अनुदान निश्चित करण्यात आले.

sandeep Shirguppe

Sangli Agriculture News : खरीप हंगामात २०२३ मध्ये कापूस व सोयाबीन पीक लागवड करून त्याची ई-पीक पाहणी ऑनलाईन केलेल्या शेतकऱ्यांना शासनाने अर्थसाहाय्य योजनेतून प्रति हेक्टरी ५ हजार रूपये दोन हेक्टरच्या मर्यादीत अनुदान देण्याचा निर्णय घेतला. या अनुदानाचे वाटप टप्याटप्यात देण्यात येणार आहे.

सांगली जिल्ह्यातील या योजनेतून ६ कोटी १७ लाख रुपयांची आर्थिक मदत त्यांच्या खात्यावर जमा झाली आहे. ३१ हजार शेतकऱ्यांना याचा लाभ मिळाल्याची माहिती जिल्हा कृषी अधीक्षक विवेक कुंभार यांनी दिली.

सांगली जिल्ह्याचे जिल्हा कृषी अधीक्षक विवेक कुंभार म्हणाले की, एक हेक्टर कापूस आणि सोयाबीन पिकाला प्रत्येकी पाच हजार असे अनुदान निश्चित करण्यात आले. अर्थसाहाय्य योजनेत शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी ११ ऑगस्टपासून प्रत्येक गावात कृषी सहायकांनी योजनेची यादी लावली आहे.

जिल्ह्यातील सोयाबीन व कापूस उत्पादकांना झालेल्या नुकसानीसाठी आर्थिक मदत म्हणून कृषी विभागाद्वारे ०.२ हेक्टरहून कमी क्षेत्रासाठी सरसकट एक हजार व त्याहून अधिक क्षेत्रासाठी (दोन हेक्टरच्या मर्यादित) पाच हजार रुपये मदत पात्र उत्पादकांच्या खात्यात जमा केली आहे. हा पहिला टप्पा आहे. संमतीपत्र येईल तसे राहिलेल्या शेतकऱ्यांचे अनुदान खात्यावर जमा केले जाईल अशी माहिती कुंभार यांनी दिली.

सोयाबीन व कापूस पिकास एका हेक्टरपर्यंत पाच हजार रुपयांचे अर्थसाहाय्य मिळणार, अशी घोषणा यापूर्वीच सरकारने केली होती. हेक्टरी पाच हजार रुपये मदत देण्याचा निर्णय झाला होता. शेतकऱ्यांसाठी याद्या गावात लावण्यात आल्या होत्या. शेतकऱ्यांनी केवळ आधार कार्डची झेरॉक्स देऊन गावातील कृषी सहायकांकडे फॉर्मवर नाव व स्वाक्षरी करून दिल्याने पैसे जमा होण्यास सुरूवात होत आहे.

कुठलाही खर्च नाही

कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसाहाय्य योजनेचा लाभ देण्यासाठी शेतकऱ्यांचा कोणताही वेगळा खर्च होणार नाही, याची दक्षता शासनाने या योजनेत घेतली होती. गावात लावलेल्या यादीत नाव असल्यास केवळ आधार कार्डची झेरॉक्स व शासनाने निर्धारित केलेले प्रतिज्ञापत्र शेतकऱ्यांनी भरून कृषी सहायकांकडे देण्याचे आवाहन करण्यात आले होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT