Cotton Cultivation Agrowon
ॲग्रो विशेष

Cotton Cultivation : सघन पद्धतीने कापूस लागवड करावी : अनुप धोत्रे

Cotton Production : कृषी विज्ञान केंद्राच्या पुढाकाराने मालवाडा (ता. बाळापूर) येथे अतिघनता पद्धतीने कापूस लागवड या विषयवरील किसान मेळा कार्यक्रम घेण्यात आला.

 गोपाल हागे

Akola News : कृषी विज्ञान केंद्राच्या पुढाकाराने मालवाडा (ता. बाळापूर) येथे अतिघनता पद्धतीने कापूस लागवड या विषयवरील किसान मेळा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमात शेतकऱ्यांना अतिघनता पद्धतीने कापूस लागवडीबद्दल माहिती देण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अनुप संजय धोत्रे होते.

या वेळी अतिसघन पद्धतीने कपाशी लागवड तंत्रज्ञानाचे फायदे शेतकऱ्यांना विषद केले व गाव पातळीवर कापूस प्रक्रिया उद्योगावर भर देऊन रोजगार उपलब्धता व त्याआधारित जोडधंदे यावर शेतकऱ्यांनी भर द्यावा, असे त्यांनी प्रतिपादन केले.

मेळाव्याला प्रमुख पाहुणे म्हणून नागपूर येथील केंद्रीय कापूस अनुसंधान संस्थेचे संचालक डॉ. वाय. जी. प्रसाद, वरिष्ठ शास्त्रज्ञ (कृषीविद्या) डॉ. रामकृष्ण जी आय., वनस्पती रोगशास्त्र वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. शैलेश गावंडे, केव्हीकेचे प्रमुख डॉ. उमेश ठाकरे, कृषिविद्या विषय विशेषज्ज्ञ कुलदीप देशमुख, मिलिंद चव्हाण, शरद रत्नपारखी, श्रीकांत नरकांडे, प्रगतिशील शेतकरी दिलीप ठाकरे उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात ठाकरे यांनी अतिघनता पद्धतीने कापूस लागवड या प्रकल्पाचे उद्देश स्पष्ट केले. तसेच अतीसघन पद्धतीने कापूस लागवड तंत्रज्ञान या विषयावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत या पद्धतीने कपाशी लागवडीचे फायदे सांगितले. केंद्र सरकारने देशात अतिसघन कापूस लागवडीला प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला आहे.

या अंतर्गत ९० बाय १५ किंवा ९० बाय ३० या अंतरावर लागवड केली जाईल. त्यामध्ये शाखीय (कॅनॉपी) वाढ रोखण्यासाठी ‘पीजीआर’चा वापर, अन्नद्रव्य व्यवस्थापन व इतर तांत्रिक बाबींचा समावेश आहे.

डॉ. वाय. जी. प्रसाद यांनी अतिघनता पद्धतीने कापूस लागवड या प्रकल्पामध्ये खासगी-सार्वजनिक भागीदारीतून या प्रकल्पाची अंमलबजावणी होईल. त्यामध्ये वस्त्रोद्योग, बियाणे उद्योग, राज्याचा कृषी विभाग, अटारी (ॲग्रिकल्चर टेक्नॉ्लॉजी ॲप्लिकेशन रिसर्च), कृषी विज्ञान केंद्र तसेच सीसीआय (कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया) यांचा समावेश आहे, असे सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Processing Success: सोयाबीन प्रक्रियेतून महिला गटाची प्रगती

Shaktipeeth Highway Protest: शक्तिपीठ महामार्गाविरोधात सोमवारी राज्यभर आंदोलन

Smart Farming: स्मार्ट शेती : गरज, तंत्रज्ञान आणि भविष्य

Bhusar Market Closure: मार्केट यार्डातील भुसार बाजार २५ फेब्रुवारीला राहणार बंद

Sunflower Farming: कमी कालावधीच्या सूर्यफूल वाण पेरणीस पसंती

SCROLL FOR NEXT