Cotton Industry Agrowon
ॲग्रो विशेष

Cotton Processing Industry : कापूस प्रक्रिया उद्योग संथ

Agricultural Challenges : कापसाची आवक कमी आहे. दर हवे तसे नसल्याने कारखानदार अधिक खरेदी व जोखीम टाळत असल्याची स्थिती आहे.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशातील कापूस प्रक्रिया उद्योग संथ गतीने सुरू आहे. पावसाच्या शक्यतेने मागील दोन-तीन दिवसांपासून प्रक्रियेची गती कमी झाली. तसेच कापसाची आवक कमी आहे. दर हवे तसे नसल्याने कारखानदार अधिक खरेदी व जोखीम टाळत असल्याची स्थिती आहे.

खानदेशात भारतीय कापूस महामंडळाकडून (सीसीआय) कापूस खरेदी सुरू आहे. या खरेदी केंद्रांतही कापूस खरेदीला गती आली आहे. यातच कापसाची लागवड खानदेशात यंदा सुमारे ६० हजार हेक्टरने घटली होती. अतिपाऊस व किडी, बोंड अळी यामुळे कापूस उत्पादनही एकरी दोन ते दीड क्विंटल एवढेच हाती आले आहे.

यामुळे कापसाचा साठाही शेतकऱ्यांकडे कमी आहे. जळगाव जिल्ह्यातील कापूस लागवड पाच लाख ६७ हजार हेक्टरवरून पाच लाख ११ हजार हेक्टर एवढी झाली होती. धुळ्यात सुमारे एक लाख ९० हजार आणि नंदुरबारात सुमारे ९० हजार हेक्टरवर कापूस पीक होते.

पूर्वहंगामी कापूस मागील महिन्यातच अनेकांनी काढून त्यात मका, गहू, हरभरा आदींची पेरणी केली. यामुळे कापूस उत्पादनात पर्यायाने आवकेत मोठी घट दिसत आहे. कापूस प्रक्रिया उद्योग दिवाळीनंतर सुरू झाले. पण प्रक्रियेची गती संथ होती

कापूस गाठींचे कमी उत्पादन

खानदेशात डिसेंबरमध्ये कापूस गाठींच्या उत्पादनाची गती वाढते. परंतु यंदा ही गती वाढलीच नाही. डिसेंबरअखेर सुमारे सहा ते सात लाख कापूस गाठींचे उत्पादन साध्य केले जाते. परंतु यंदा सुमारे चार लाख कापूसगाठींचे उत्पादन (एक गाठ १७० किलो रुई) झाल्याची माहिती मिळाली. एकूण २२ ते २३ लाख कापूस गाठींचे उत्पादन कापूस हंगामात घेतले जाते. परंतु यंदा यात ३० ते ३५ टक्के घट येईल, असाही अंदाज आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Panchnama: शेतकऱ्यांना कागदपत्रांच्या अटीत अडकवू नका; पिकांचे सरसकट १०० टक्के पंचनामे करा, कैलास पाटील यांची मागणी

Produce Quality Management: जागतिक, भारतीय मानकानुसार गुणवत्ता तपासणारी यंत्रे

Drought Management: लोकसहभागातून संकटावर मात..

Masala Business Success: अस्सल चवीच्या रिठे मसाल्यांनी मिळविली ग्राहकांची पसंती

Collective Farming Model: एकत्र आलो म्हणून पुढे गेलो...

SCROLL FOR NEXT