Cotton Council Agrowon
ॲग्रो विशेष

Cotton Council : छत्रपती संभाजीनगर येथे आज कापूस परिषद

All India Cotton Council : विविध पैलूंचा अभ्यास करण्यासाठी, भारतीय कॉटन असोसिएशन आणि महाराष्ट्र जीनर्स कॉटन असोसिएशनच्या वतीने शनिवारी (ता. २१) छत्रपती संभाजीनगर येथे राष्ट्रीय स्तरावरील अखिल भारतीय कापूस परिषद आयोजित करण्यात आली आहे.

Team Agrowon

Chhatrapati Sambhajinagar : विविध पैलूंचा अभ्यास करण्यासाठी, भारतीय कॉटन असोसिएशन आणि महाराष्ट्र जीनर्स कॉटन असोसिएशनच्या वतीने शनिवारी (ता. २१) छत्रपती संभाजीनगर येथे राष्ट्रीय स्तरावरील अखिल भारतीय कापूस परिषद आयोजित करण्यात आली आहे.

या परिषदेसाठी प्रमुख पाहुणे केंद्रीय वस्त्रोद्योग आयुक्त श्रीमती रूप राशी, कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक ललितकुमार गुप्ता उपस्थित राहतील. या परिषदेला दहा राज्यांतील विविध संघटनांचे एक हजार प्रतिनिधी उपस्थित राहणे अपेक्षित आहे. खानदेश जिनर्स असोसिएशन आणि विदर्भ कॉटन असोसिएशन या परिषदेसाठी सहभागीदार असतील.

यूएसए आणि चीनमधील बदलत्या गतिशीलतेमुळे भारताला जागतिक कापूस बाजारात आपली भूमिका मजबूत करण्याची संधी मिळते. या संधींचा पूर्ण फायदा घेण्यासाठी, कार्यक्षमता वाढवणे, उत्पादनाची गुणवत्ता सुधारणे आणि प्रदूषण कमी करणे आवश्यक आहे. या परिषदेदरम्यान, उद्योग नेते आणि तज्ज्ञ या गंभीर मुद्द्यांवर त्यांचे विचार मांडतील.

परिषदेचे निमंत्रक आणि महाराष्ट्र कॉटन जीनर्स असोसिएशनचे खजिनदार रसदीपसिंग चावला यांच्या माहितीनुसार, भारताची धोरणात्मक स्थिती, उत्पादनावरील तंत्रज्ञानाचा परिणाम आणि स्पर्धात्मकता टिकवून ठेवण्यासाठी आवश्यक कौशल्ये या विषयांवर परिषदेत चर्चा केली जाईल. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या, नावीन्यपूर्ण कापूस विक्रेते, दलाल यांनाही पुरस्कार प्रदान केले जातील.

भारतातील कापूस गाठींचे उत्पादन आणि आगामी वर्षातील अंदाज, गुणवत्तेवर चर्चा होईल. दहा राज्यांच्या संघटनांच्या प्रतिनिधींद्वारे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील भारताच्या स्पर्धात्मक स्थितीवर चर्चा होईल. वर्षभरात सूत निर्यात करताना सूत गिरण्यांसमोरील आव्हाने व या आव्हानांचे संधीत रूपांतर कसे करता येईल यावरही तज्ज्ञ चर्चा करतील

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rabi Jowar Seed Scheme: रब्बी ज्वारी मिनीकिटसाठी नोंदणी करा; कृषी विभागाचे आवाहन

Wetland Ecosystems: पाणथळ सृष्टी व्यवस्थेचे विश्व

Interview with Jaykumar Gore: दुष्काळमुक्ती अन् रोजगारनिर्मितीस प्राधान्य

Spider Mite Issue: वांग्यावरील लाल कोळीची समस्या

Microgreen Farming: नेदरलँड्समधील मायक्रोग्रीन शेती

SCROLL FOR NEXT