Kolhapur Market Committee : कोल्हापूर येथील बाजार समितीत भाज्यांची आवक वाढू लागल्याने दरामध्ये किंचित घट झाल्याचे दिसून येत आहे. मात्र, मेथीचे भाव चांगले आहेत तर लातूर तसेच कर्नाटकातील गदग भागातून कोथिंबिरीची आवक बाजार समितीत वाढली आहे. तुलनेने स्थानिक आवक कमी आहे. लसणाच्या प्रतिकिलो दरात पुन्हा ३० ते ४० रुपयांची वाढ झाली आहे. दरम्यान पुढील आठवड्यापासून लग्नसराईची धामधूम सुरू होणार असल्याने भाजीपाला बाजार तेजीत येणार आहे.
शाहूवाडी, चंदगड तालुक्यातून रताळ्याची हंगामी आवक सुरू झाली आहे. फळबाजारत गावरान देशी बोरे दाखल होत आहेत. स्ट्रॉबेरीचा हंगाम सुरू झाल्याने आवक हळूहळू वाढत आहे. फुलबाजारात फुलांची आवक मोठी असूनही फुलांचे भाव वाढल्याने फूल उत्पादक शेतकऱ्यांना चांगला फायदा होत आहे.
भाजीपाल्याचे दर असे (किलो)
टोमॅटो- ३० ते ४०, दोडका- ५० ते ६० , वांगी - ८० ते १००, कारली- ४० ते ५० , ढबू मिरची- ६० ते ८०, मिरची - ४० ते ५०, फ्लॉवर - ६० ते ८०, कोबी- ४० ते ५०, बटाटा- ४० ते ५०, नवा कांदा - ४० ते ५०, जुना कांदा - ६० ते ७० , लसूण- ३८० ते ४००, आले - १२० ते १६०, लिंबू - २०० ते ५०० शेकडा, गाजर - ४० ते ५०, बीन्स- ८० ते १०० गवार - १०० ते १४०, भेंडी- ६० ते ८०, देशी काकडी- ७० ते ८०, काटा काकडी - ४० ते ५०, दुधी - ४० ते ५०, भाज्या - १५ ते २०, मेथी २५ ते ३० पेंढी, शेवगा पेंडी - १० ते १२ रुपये.
फुलांचे दर (किलो)
झेंडू - ८० ते १००, निशिगंध - १५० ते २००, गुलाब - २५० ते ३००, गलाटा - १०० ते १२०, शेवंती - १०० ते १२०, आष्टर - १०० ते १२० रुपये.
सफरचंद - २२० ते ४००, संत्री - १२० ते १३०, मोसंबी - ८० ते १००, डाळिंब- २०० ते ३००, चिकू - १०० ते १२०, पेरू - ५० ते ८०, खजूर -१५० ते २००, पपई - ६० ते १००, मोर आवळा - १२० ते २००, सीताफळ - १५० ते २००, कलिंगड - ५० ते ६० नग, टरबूज - ४० ते ६०, केळी - ५० ते ६० डझन, देशी केळी - १०० ते १२० डझन, किवी - १६०, ड्रॅगन - १५० ते २००, चिंच- १०० ते १४०, अननस - ४० ते ५० रुपये.
खाद्यतेलाचे दर (किलो)
सरकी - १४२ ते १४८, शेंगतेल - १९० ते १९५, सोयाबीन - १३८ ते १४४, पामतेल - १३८ ते १४२, सूर्यफूल - १४० ते १४५ रुपये.
हायब्रीड ज्वारी - २८ ते ३५, बार्शी शाळू - ३० ते ५०, गहू - ३५ ते ४४, हरभरा डाळ - ९० ते ९४, तुरडाळ - १५० ते १६० , मुगडाळ - १०७ ते ११३, मसूरडाळ - ७७ ते ७८ , उडीदडाळ - १२० ते १२५, हरभरा- ८० ते ८२, मूग- ९२ ते १००, मटकी - ९५ ते १००, मसूर - ७० ते ७२, फुटाणाडाळ - १०५ ते ११०, चवळी - ९० ते १२५ , हिरवा वाटाणा- १७५, छोले - १२० ते १५० रुपये.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.