Devendra Fadnavis Agrowon
ॲग्रो विशेष

Devendra Fadnavis : सहकारी पाणी योजनांनाही वीजबिल माफी देऊ

Agriculture Electricity Update : शेतीला दिवसा वीज देण्यासाठी शेतकरी वीज वितरण कंपनी सुरू करून त्याअंतर्गत १४ हजार मेगावॉटचे सोलरचे प्रकल्प सुरू करत आहोत.

विकास जाधव : अॅग्रोवन वृत्तसेवा

Satara News : शेतीला दिवसा वीज देण्यासाठी शेतकरी वीज वितरण कंपनी सुरू करून त्याअंतर्गत १४ हजार मेगावॉटचे सोलरचे प्रकल्प सुरू करत आहोत. त्यातील दोन हजार मेगावॉटचे प्रकल्प सुरू झाले. १८ महिन्यांनंतर हे प्रकल्प पूर्ण होतील आणि दिवसा २४ तास वीज शेतकऱ्यांना देण्यात येईल.

शेतकऱ्यांना वीजबिल माफी केली आहे. पुढील पाच वर्षे शेतकऱ्यांना बिले भरण्याची गरज नाही. तीन हजार कोटी रुपये खर्चून सहकारी पाणी पुरवठा योजना हा सोलरवर सुरू करणार आहोत. त्यातून वीज तीन रुपयांनी पडणार असून, त्यातून शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपये वाचणार असून त्यातून पाणी योजनांना भविष्यात वीजबिल माफी देऊ शकू, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

कऱ्हाड दक्षिण विधानसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. श्री. फडणवीस म्हणाले, की आजची ही सभा कऱ्हाड दक्षिणच्या परिवर्तनाची सभा आहे. या वेळी कऱ्हाड दक्षिणचा फैसला झाला असून अतुल भोसलेच आमदार होतील.

कऱ्हाडला विविध विकास कामे त्यांनी मार्गी लावली आहेत. देशात जेवढी परदेशी गुंतवणूक आली त्यापैकी ५२ टक्के गुंतवणूक महाराष्ट्रात आणली आहे. आमच्या खिसगणतीतही इतर कोणतेही राज्य नाही. अजूनही गुंतवणूक येत आहे. शेतकऱ्यांसाठी आमच्या सरकारने अनेक निर्णय घेतले आहेत.

कारखान्यांना जादा दर दिल्यामुळे तो नफा समजून कर भरावा लागणार होता. मात्र केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांनी एका दणक्यात १० हजार कोटींचा आयकर रद्द केला. त्यामुळे कारखान्यांना दिलासा मिळाला आहे. पुढील पाच वर्षे शेतकऱ्यांना बिले भरण्याची गरज नाही. तीन हजार कोटी रुपये खर्चून सहकारी पाणी पुरवठा योजना हा सोलरवर सुरू करणार आहोत. त्यातून वीज तीन रुपयांना पडणार असून त्यातून शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपये वाचणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Paddy Variety : दुर्मीळ भातवाण जपण्यासोबतच कंपनीने साधली प्रगती

Dairy Processing Business : शून्यातून विस्तारलेला काळे बंधूंचा प्रक्रिया उद्योग

Crop Advisory : कृषी सल्ला : कोकण विभाग

Milk Processing Equipment : दुग्धजन्य पदार्थांच्या निर्मितीसाठी यंत्रे

Women Empowerment : सनद - महिलांचे जीवनमान सुधारण्याची

SCROLL FOR NEXT