Cooperative Election Agrowon
ॲग्रो विशेष

Cooperative Election : सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा बिगूल वाजला

Cooperative Sector : रखडलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा बिगूल अखेर फुंकल्या गेला आहे. जिल्ह्यातील ब वर्गातील सहा संस्थेच्या संचालक मंडळाचा निवडणूक कार्यक्रम जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून जाहीर करण्यात आला आहे.

Team Agrowon

Amaravati News : रखडलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा बिगूल अखेर फुंकल्या गेला आहे. जिल्ह्यातील ब वर्गातील सहा संस्थेच्या संचालक मंडळाचा निवडणूक कार्यक्रम जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून जाहीर करण्यात आला आहे.

सहा एप्रिल रोजी याकरिता निवडणुका होणार असून २७ फेब्रुवारी ते पाच मार्चदरम्यान नामांकन दाखल करण्याची प्रक्रिया प्रारंभ झाली आहे. वर्षभरात सहकारातील ६६ संस्थांचा कार्यकाळ संपत असल्याने टप्प्या-टप्प्यात निवडणुका लावल्या जाणार आहे. पहिल्या टप्प्यात सहा संस्थांमध्ये एकूण ७४ संचालकांकरिता निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे.

या सहाही संस्थेत २७ फेब्रुवारी ते पाच मार्चदरम्यान सकाळी ११ ते ३ वाजेपर्यंत नामांकन उचल व स्वीकारले जाणार आहे. त्याच दिवशी प्राप्त नामांकनाची यादी प्रसिद्ध होईल. सहा मार्च रोजी प्राप्त नामांकनाची छाननी केली जाईल. सात मार्च रोजी वैध उमेदवारांची यादी प्रसिद्ध केल्यानंतर या उमेदवारांना सात ते २१ मार्चदरम्यान अर्ज मागे घेण्याची संधी दिली जाणार आहे.

२४ मार्च रोजी निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करून त्यांना चिन्हांचे वाटप केले जाणार आहे. त्यानंतर सहा एप्रिल रोजी सकाळी आठ ते सायंकाळी चार वाजेपर्यंत मतदान होईल. मतदानानंतर त्याच दिवशी मतमोजणी पार पडेल. निवडणूक प्रक्रियेकरिता सहकार विभाग सज्ज झाला असून संस्थानिहाय निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची देखील घोषणा करण्यात आली आहे.

या संस्थांच्या निवडणुका

विभागीय सेवायोजन कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्या. अमरावती विभाग येथे ११ संचालक स्वास्थ्य सेवा हिवताप सेवकांची सहकारी पतसंस्था मर्या. अमरावती येथे ११ पदाकरिता, वलगाव सेवा संस्था मर्या. संस्थेत १३, नया वाठोडा सेवा सहकारी संस्था मर्या. मोर्शी १३, अंबाडा सेवा सहकारी संस्था मर्या. मोर्शी १३ व काळगव्हाण सेवा सहकारी संस्था, अंजनगावसुर्जी येथे १३ संचालकांकरिता निवडणूक होणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

YCMOU Open University: मुक्त विद्यापीठाची ‘फ्यूचर ऑफ लर्निंग’कडे वाटचाल; डॉ. कलसी

MGNREGA Workers Protest: ‘मग्रारोहयो’ ठप्प, शासन गप्प!

Farm Roads: पाणंद रस्ते योजना प्रभावीपणे राबवा

Bael Tree Conservation: निसर्ग मित्रच्या वतीने बेल वृक्ष संवर्धन कृती उपक्रम

Sugarcane Crushing Season: साताऱ्यात ऊस गाळपाची कोटीकडे वाटचाल

SCROLL FOR NEXT