Onion Purple Blotch Agrowon
ॲग्रो विशेष

Onion Crop Management : कांद्यावरील जांभळा करपा रोगाचे नियंत्रण

Crop Protection : कांदा पिकावरील जांभळा करपा हा बुरशीजन्य रोग असून अल्टरनेरिय पोराय (Alternaria porri) या बुरशीमुळे होतो. कांदा पिकाच्या कोणत्याही अवस्थेत या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतो.

Team Agrowon

डॉ. दत्तात्रय गावडे, मीनल पोखरकर

Onion Purple Blotch Disease : कांदा पिकावरील जांभळा करपा हा बुरशीजन्य रोग असून अल्टरनेरिय पोराय (Alternaria porri) या बुरशीमुळे होतो. कांदा पिकाच्या कोणत्याही अवस्थेत या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतो. या रोगाच्या प्रादुर्भावामुळे पिकाचे सुमारे ५० ते ६० टक्क्यांपर्यंत नुकसान होते. बीजोत्पादनाच्या पिकावर देखील प्रादुर्भाव होतो.

पोषक वातावरण

बुरशीच्या वाढीसाठी १८ ते २० अंश सेल्सिअस तापमान व ८० टक्के आर्द्रता आवश्यक.

प्रसार

बियाण्यांतून हवेद्वारे. अनुकूल वातावरण मिळताच प्रादुर्भाव वाढतो.

लक्षणे

पानावर सुरुवातीला खोलगट, लांबट पांढुरके चट्टे पडतात. चट्ट्यांचा मधला भाग सुरुवातीस जांभळट व नंतर काळपट होतो. अनेक चट्टे एकमेकांत मिसळून पाने करपून वाळतात.

झाडांच्या माना मऊ पडतात. (फुलांचे दांडे मऊ पडल्याने वाकतात किंवा मोडून पडतात)

हा रोग झाडांचा कुजलेला पालापाचोळा व फांद्यांवर १२ महिन्यांपर्यंत राहतो.

उपाय

दोन ते तीन वर्षांसाठी पिकाची फेरपालट करावी.

पुनर्लागवडीपूर्वी रोपे ५० अंश सेल्सिअस तापमानाच्या गरम पाण्यामध्ये २० मिनिटे बुडवावीत.

प्रादुर्भाव दिसताच शिफारशीत घटकांची रासायनिक फवारणी त्वरित घ्यावी.

रासायनिक फवारणी (प्रति लिटर पाणी)

मॅन्कोझेब (०.२५ टक्का) २.५ ग्रॅम किंवा

क्लोरोथेलोनील (०.२५ टक्का) २.५ ग्रॅम किंवा

मेटीराम (५५ टक्के) अधिक पायराक्लोस्ट्रोबिन (५ टक्के डब्ल्यूजी) १ ग्रॅम (संयुक्त बुरशीनाशक) किंवा

टेब्युकोनॅझोल (०.१ टक्का) १ मिलि किंव

हेक्साकोनॅझोल १ मिलि किंवा

प्रोपिकोनॅझोल १ मिलि

या प्रमाणे प्रति लिटर पाण्यात स्टिकर ०.६ मिलि याप्रमाणे मिसळून दर १० ते १५ दिवसांच्या अंतराने आलटून पालटून फवारणी करावी.

- डॉ. दत्तात्रय गावडे, ९४२१२७०५१०,

(डॉ. दत्तात्रय गावडे हे पीक संरक्षण विषयतज्ज्ञ म्हणून कृषी विज्ञान केंद्र, नारायणगाव, जि. पुणे येथे, तर मीनल पोखरकर या कीटकशास्त्रज्ञ आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

VBG-Ram-ji: ग्रामीण रोजगाराच्या हमीची ऐशी-तैशी

Indian Political Challenges: राहुल गांधी आणि ‘सीजेपी’चे सरकारपुढे आव्हान

NHB Subsidy Cut: लेखाजोखा ‘एनएचबी’चा!

AI in Agriculture: कृषीतील एआय, रोबोटिक्स, ड्रोन तंत्रज्ञानाला नवी दिशा

POCRA Project Audit: ‘पोकरा’ प्रकल्पाचे पूर्ण लेखापरीक्षण करा: किशोर तिवारी

SCROLL FOR NEXT