ॲग्रो विशेष

Monsoon Update: वारणा धरण क्षेत्रात संततधार पाऊस

Maharashtra Weather: वारणा धरण पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस सुरूच असून गेल्या चोवीस तासांत ७७ मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. तर इतर तालुक्यात हलका पाऊस झाला असून जिल्ह्यात ६ मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे.

Team Agrowon

Sangali News: वारणा धरण पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस सुरूच असून गेल्या चोवीस तासांत ७७ मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. तर इतर तालुक्यात हलका पाऊस झाला असून जिल्ह्यात ६ मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. वारणा नदीची पाणीपातळी चार दिवसांपासून स्थिर आहे.

जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून पावसाने उघडीप दिली आहे. अधूनमधून हलका पाऊस पडत आहे. शिराळा तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. शिराळा तालुक्यात दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा संततधार पाऊस सुरू झाला आहे.

वारणा धरण पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस सुरू आहे. गेल्या चोवीस तासांत ७७ मिलिमीटर इतका पाऊस झाला आहे. संततधार पाऊस सुरू असल्याने धरणात ८५४२ क्युसेकने पाण्याची आवक सुरू असून वारणा जलविद्युत प्रकल्पातून १७३० क्युसेकने विसर्ग सुरू आहे.

धरणात २०.३४ टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे.शिराळा तालुक्यातील कोकरूड व शाहूवाडी तालुक्यातील रेठरे दरम्यानचा वारणा नदीवरील बंधारा चार दिवसांपासून पाण्याखाली गेल्याने दोन्ही तालुक्यांतील काही गावांचा जवळचा संपर्क तुटला आहे.

शिराळा येथील मोरणा धरण व वाकुर्डे बुद्रुक (करमजाई), अंत्री बुद्रुक (मानकरवाडी), शिवणी, टाकवे, रेठरे धरण येथील तलाव अशा पाच तलाव पूर्ण क्षमतेने भरले आहेत.तालुकानिहाय पाऊस (मिलिमीटर)मिरज-१.१, जत-०.३, खानापूर-विटा-४.१, वाळवा-८.९, तासगाव-२.७, शिराळा-३८.९, आटपाडी-१.३, कवठेमहांकाळ-१.१, पलूस-६.४, कडेगाव-६.७

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Panchnama: शेतकऱ्यांना कागदपत्रांच्या अटीत अडकवू नका; पिकांचे सरसकट १०० टक्के पंचनामे करा, कैलास पाटील यांची मागणी

Produce Quality Management: जागतिक, भारतीय मानकानुसार गुणवत्ता तपासणारी यंत्रे

Drought Management: लोकसहभागातून संकटावर मात..

Masala Business Success: अस्सल चवीच्या रिठे मसाल्यांनी मिळविली ग्राहकांची पसंती

Collective Farming Model: एकत्र आलो म्हणून पुढे गेलो...

SCROLL FOR NEXT