Warna River Kolhapur agrowon
ॲग्रो विशेष

Warna River Kolhapur : कोल्हापुरात वारणा नदी पात्रात दूषित पाणी; हजारो मृत माशांचा खच, दोन मगरींचा मृत्यू

Contaminated Water River : नदीमध्ये दूषित पाणी आल्याने नदीकाठच्या नागरिकांनी पाणी उकळून पिण्याचे आवाहन ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले आहे.

sandeep Shirguppe

Crocodiles Death Warana River : वारणा नदीत दूषित पाणी आल्याने मृत माशांचा खच पडला तर दोन मगरींचाही मृत्यू झाला आहे. नदी पात्रात मळीमिश्रित पाणी सोडल्यामुळे पाणी दूषित झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दूषित पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्यासही धोका निर्माण झाला आहे. तसेच मृत मासे गोळा करून शहरातील काही विक्रेते मासे विक्रीसाठी नेत असल्याचे निदर्शनास आले आहे. तर सध्या शेती कामासाठी नदीतील पाण्याचा वापर होत असल्याने शेती पिकांनाही धोका पोहोचण्याची शक्यता आहे.

प्रत्येक वर्षी ऊस हंगाम सुरू झाल्यानंतर नदीत दूषित पाणी मिसळण्याचा प्रकार गेली अनेक वर्षे सातत्याने दिसून येत आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांत वारणा नदीच्या प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. दूषित सांडपाणी नदीत सोडणे, मासेमारीसाठी घातक गोष्टींचा वापर करणे आदींमुळे वारणा नदी प्रदूषित झाली आहे. दरम्यान, नदीमध्ये दूषित पाणी आल्याने नदीकाठच्या नागरिकांनी पाणी उकळून पिण्याचे आवाहन ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले.

माशांबरोबर मगरींचाही मृत्यू

वारणा नदीत रविवारी (ता.०८) मगरीचे मृत पिलू आढळले होते. हे प्रकरण ताजे असतानाच सोमवारी (ता.०९) उदगाव-अंकली पुलाखाली कृष्णा नदीत महाकाय मगर मृतावस्थेत पाण्यावर तरंगताना आढळली. उदगाव येथील मच्छीमारांनी कोल्हापूर वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना माहिती दिली. परंतु, या मगरीचा मृतदेह पुढे सापडला नाही.

दरम्यान, रविवारी (ता.०८) मगरीच्या पिलाचा व माशांचा वारणा नदीत दुधगाव, कवठेपिरान येथे मृत्यू झाला होता. या पार्श्वभूमीवर सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पथकाने संयुक्त पाहणी केली. वारणा आणि कृष्णा नदीतील पाण्याचे जागोजागीचे नमुने घेण्यात आले. यामध्ये नदीच्या पाण्यात मळी सोडण्यात आल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाले आहे.

कोल्हापुरातील कारखान्यातून मळी सोडली

कोल्हापूर जिल्ह्यातील एका साखर कारखान्यातून वारणा नदीत मळीमिश्रित पाणी सोडण्यात आल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले आहे. कोल्हापूर प्रादेशिक प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून त्या कारखान्यावर कायदेशीर कारवाई करण्याबाबत हालचाली सुरू आहेत, असे सांगण्यात आले.

वारणेत मृत माशांचे ढीग

वारणा नदीत सोमवारी (ता.०९) सकाळी पुन्हा मोठ्या प्रमाणात मृत मासे आढळून आले. काही तरुणांनी मोठ्या प्रमाणात मासे गोळा करून नदीतून बाजूला काढले. दरम्यान, रविवारी मृत अवस्थेतील मासे गोळा करून एका गाडीतून कुणीतरी नेले, अशी माहिती प्रदूषण नियंत्रण मंडळाला देण्यात आली. या विभागाने त्या ठिकाणचे पाण्याचे नमुने घेतले आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Monsoon Rain: मराठवाड्यात पावसाचा जोर कमीच; पूर्व विदर्भ आणि कोकणात पुढील ४ दिवस जोरदार पावसाचा अंदाज

Agrowon Podcast: गव्हाचे भाव स्थिरावले; डाळिंब तेजीत, मुग दबावात, केळीच्या दरात वाढ, उडदाचे भाव स्थिर

ZP School Admission : बोराखेडी जिल्हा परिषद शाळेत प्रवेश ‘ॲडमिशन फुल्ल’

Tree Plantation : जैवविविधता जपण्यासाठी वृक्षारोपण गरजेचे

Farmers Welfare: बच्चू कडू यांच्या मागण्यांना सरकारचा सकारात्मक प्रतिसाद; शेतकरी,मजुरांसाठी आश्वासने

SCROLL FOR NEXT