Contaminated Water Agrowon
ॲग्रो विशेष

Contaminated Water : तारापूरमध्ये दूषित पाणी

Water Pollution : गेल्या काही दिवसांपासून परिसरात कूपनलिकेतून गुलाबी रंगाचे पाणी येत असल्याने संताप व्यक्त होत आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.

Team Agrowon

Palghar News : जिल्ह्याच्या विकासामध्ये बोईसर-तारापूर औद्योगिक वसाहतीचे महत्त्वाचे योगदान आहे, मात्र अनेक कारखान्यांकडून वायुप्रदूषण व जलप्रदूषणाच्या नियमावलींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे.

त्यावर प्रशासनाचे नियंत्रण नसल्याने औद्योगिक वसाहत आणि परिसरातील गावांचे आरोग्य धोक्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून परिसरात कूपनलिकेतून गुलाबी रंगाचे पाणी येत असल्याने संताप व्यक्त होत आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.

तारापूर औद्योगिक वसाहतीमध्ये लघू, मध्यम व मोठे उद्योग दिवस-रात्र सुरू असतात. उत्पादन प्रक्रिया सुरू असताना काही कारखान्यांमधून विषारी वायू कारखान्याच्या चिमणीद्वारे व रसायनयुक्त पाणी टँकरद्वारे रात्रीच्या वेळेस व सरकारी सुटीच्या दिवशी खुलेआमपणे बाहेर सोडले जाते.

कारखान्यातील विषारी वायू हवेत पसरल्यामुळे बोईसर, सरावली, खैरापाडा, कुंबवली, पास्थळ, कलोवडा, पाम या गावांची हवा प्रदूषित होत आहे. त्याचा त्रास गावांतील नागरिकांना होतो. प्रदूषणामुळे गावातील भाजीपाला, बागायतीवर विपरीत परिणाम झाल्याचे समोर आले आहे. सध्या हिवाळा सुरू असल्याने सकाळी पडणाऱ्या धुक्यामुळे डोकेदुखी व दमा यांसारखे आजार वाढू लागले आहेत. त्यामुळे येथील स्थानिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आदेशानुसार, औद्योगिक वसाहतीमध्ये रासायनिक वायू व प्रदूषित पाणी सोडणाऱ्या कारखान्यांमध्ये प्रदूषणाचे व रसायनयुक्त पाण्याचे नमुने तपासण्यासाठी यंत्रणा बसवली आहे. ती आता अद्ययावत करून मनुष्यबळही पुरेसे उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT