MSEDCL Agrowon
ॲग्रो विशेष

Go Green Scheme : ‘पेपरलेस’मध्ये सहभागी व्हा, वीजबिलात देखील सवलत मिळवा

Paperless Electricity Bill : राज्य शासनाने ई-ऑफिस प्रणाली सुरू केली असून, त्यात पेपरलेस व्यवहार करण्यावर भर दिला आहे. त्या दिशेने महावितरणने वीज बिलांबाबत यापूर्वीच काम सुरू केले आहे.

Team Agrowon

Akola News : राज्य शासनाने ई-ऑफिस प्रणाली सुरू केली असून, त्यात पेपरलेस व्यवहार करण्यावर भर दिला आहे. त्या दिशेने महावितरणने वीज बिलांबाबत यापूर्वीच काम सुरू केले आहे. त्यासाठी गो-ग्रीन योजनेच्या माध्यमातून लाभ घेऊन वीज ग्राहकांनी पर्यावरण रक्षणासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.

महावितरणच्या गो-ग्रीन योजनेत ग्राहकांनी छापील कागदी बिलाऐवजी ई-मेलने येणाऱ्या पेपरलेस बिलाचा पर्याय स्वीकारला तर त्यांना कागदी बिल पाठविणे बंद केले जाते व प्रत्येक बिलात दहा रुपये सवलत देण्यात येते.

महावितरणच्या नागपूर प्रादेशिक विभागांतर्गत असलेल्या विदर्भातील अकराही जिल्ह्यातील मिळून एकूण ५४ हजार २७५ ग्राहक या योजनेत सहभागी होत वीजबिलात मासिक दहा रुपये सवलत मिळवित आहेत. यात नागपूर परिमंडलातील १९ हजार ७२ ग्राहकांनी या योजनेचा लाभ घेतला आहे.

त्या पाठोपाठ अकोला परिमंडलातील १३ हजार २५१, अमरावती परिमंडलातील १२ हजार ७९, चंद्रपूर परिमंडलातील ५ हजार १३५, तर गोंदिया परिमंडलातील ४ हजार ७३८ ग्राहकांचा समावेश आहे.

ई-ऑफीस प्रणालीमध्ये प्रत्यक्ष कागदाचा वापर न करता माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून पेपरलेस कामावर भर आहे. वीज ग्राहकांनी गो- ग्रीनच्या सवलतीचा लाभ घेतला तर छापील बिले कमी होऊन कागदाचा वापर कमी होईल व पेपरलेस कामाला चालना मिळेल तसेच पर्यावरणाचे रक्षण होईल.

‘गो ग्रीन’ होण्यासाठी काय करावे?

ज्या ग्राहकांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे, त्यांना महावितरणच्या मोबाइल अॅपद्वारे किंवा संकेत स्थळाच्या https://pro.mahadiscom.in/Go-Green/gogreen.jsp या लिंकवर जाऊन ग्राहक क्रमांक आणि बिलिंग युनिट ही माहिती भरून नोंदणी करता येते.

याबाबतची अधिक माहिती महावितरणच्या www.mahadiscom.in या संकेत स्थळावर उपलब्ध आहे. ग्राहकाला हवे तेव्हा त्याला ई-मेलने आलेल्या बिलाचा प्रिंट घेता येते. त्यासोबत सर्वच ग्राहकांना त्यांच्या बिलाविषयी नियम व माहिती देणारे एसएमएसही पाठविले जात आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: सरकीचा भाव तेजीत; कापूस टिकून, सोयाबीनमध्ये चढ उतार, खरबूजाला उठाव तर टोमॅटो आवक टिकून

Orchards Rain Damages: पावसाचा फळबागांचा फटका

khandesh Water Storage: मध्यम, लघु प्रकल्पांत जलसाठा ५० टक्क्यांपर्यंत

Maharashtra Rain Prediction: पूर्व विदर्भात ५ दिवस पावसाचा अंदाज; उद्यापासून राज्यात पावसाचे वातावणर निवळण्याची शक्यता

Unseasonal Rain Crisis: वादळी पावसाचा तिसऱ्यांदा तडाखा

SCROLL FOR NEXT